मोठ्या संख्येनं उपस्थित रहाण्याचे मुंडे परिवाराचे आवाहन

 राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव येथे ह.भ. प. नाना महाराज कदम यांचे कीर्तन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तळेगाव येथे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ पंचक्रोशितील नागरिकांनी कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

         राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले असे थोर संत श्री भगवान बाबा यांची जयंती गेल्या १९ वर्षांपासून तळेगाव येथे साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने मित्ती पौष क्र.१ शके १९४५ शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम (सद्गुरू बंकट स्वामी संस्थान नेकनूर) यांचे दुपारी १ ते ३ कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ व पंचक्रोशितील ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी कदम महाराज यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी परळी ते बीड रोड तळेगाव , ता.परळी वैजनाथ येथे उपस्थित रहावे असे आवाहन दगडूबा बळीराम मुंडे, रमेश दगडूबा मुंडे, कुंडलिकराव बळीराम मुंडे, गणेश कुंडलिक मुंडे, अंकुश कुंडलिक मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार