शेषेराव संपतराव कराड यांचे निधन

 वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांना पितृशोक



शेषेराव संपतराव कराड यांचे निधन


परळी, प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांचे मेहुणे शेषेराव संपतराव कराड यांना गुरुवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देवाज्ञा झाली. वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश आप्पा कराड यांचे ते वडील होत. दिवंगत शेषेराव कराड यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता इंजेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

     लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांचे मेहुणे, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या आत्याचे पती, वैजनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेशआप्पा कराड यांचे वडील शेषेराव संपतराव कराड यांचे वयाच्या 95 या वर्षी  निधन झाले. दिवंगत शेषराव कराड अतिशय धार्मिक व सुस्वभावी म्हणून सर्वत्र परिचित होते.  त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक भावना व्यक्त होत आहेत.

दिवंगत शेषराव कराड यांच्या पार्थिवावर  इंजेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आमदार केशवराव आंधळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम कडपे, वैजनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय गोल्हार, आदींची उपस्थिती होती.

दिवंगत शेषेराव कराड यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे आदी भरगच्च परिवार आहे.

राख सावडण्याचा विधी   

      दरम्यान दिवंगत शेषराव कराड यांचा राख सावडण्याचा विधी इंजेगाव येथे दि. 26 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार