ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन

 परळीत गुरुवारपासून रंगणार 'नामदार चषक' क्रिकेट स्पर्धेचा थरार!




गुरुवारी सायंकाळी 5 वा. ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन


परळी मतदारसंघातून 200 पेक्षा अधिक संघ होणार सहभागी - अजय मुंडे


परळी वैद्यनाथ (दि. 24) - परळी वैद्यनाथ शहरात ना.धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या 'नामदार चषक' 'डे - नाईट' क्रिकेट स्पर्धेच्या सामान्यांचा थरार उद्या (गुरुवार ता.25) पासून रंगणार आहे. 


गुरुवारी सायंकाळी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. यासाठी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदान जिल्हा परिषदेचे गटनेते तथा स्पर्धेचे समन्वयक अजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज करण्यात आले असुन, डे - नाईट सामन्यांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 


सदर स्पर्धा ही परळी वैद्यनाथ मतदारसंघातल्या खेळाडूंसाठी राखीव असून, आतापर्यंत परळी शहरातील सुमारे 90 तर ग्रामीण मधून 110 पेक्षा अधिक संघांनी नोंदणी केली असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक तथा बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी दिली आहे.


दरम्यान या स्पर्धेतील सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येणार असून, अंतिम सामन्यांसाठी शहरी 1 लाख व ग्रामीण 1 लाख हे मुख्य पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर अन्य सामन्यांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 


या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी 5 वा.वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानात ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न होणार असून, यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष तुळशीराम पवार, दिव्यांग कल्याण मंडळाचे डॉ.संतोष मुंडे, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड, शहराध्यक्ष सय्यद सिराज, अविनाश गवळी, अल्ताफ पठाण, अनंत इंगळे, रवी आघाव, बालाजी वाघ, विष्णू गित्ते, रणजित चाचा लोमटे, गणेश देशमुख यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार असून, जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार