विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

 विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर



सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर विद्या जयंत कुलकर्णी IPS यांना आज उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले.

मूळ सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे या छोट्याशा गावातील असलेल्या विद्या कुलकर्णी तसेच पंढरपूर हे आजोळ असलेल्या १९९८ बॅचच्या तामिळनाडू केडर च्या आयपीएस आहेत. तिऱ्हे  च्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन नंतर सांगली वालचंद या प्रतिष्ठित महाविद्यालयातून बीई ( कॉम्प्युटर ) चे शिक्षण घेतले आहे.

सध्या त्या सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर ( साऊथ झोन ) पदावर दिल्ली येथे कार्यरत आहेत.

धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी यांच्या त्या लहान भगिनी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!