सर्वांचे सहकार्य व गावकऱ्यांचे योगदान यामुळे पुरस्कार- डॉ. राजाराम मुंडे

 आर.आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार:परळी तालुक्याला बहुमान: टोकवाडी ठरली 'स्मार्ट व्हिलेज'


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख गाव म्हणून परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतचा नावलौकिक आहे. या ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानातील जिल्हास्तरावरील व विभागीय स्तरावरील पारितोषिके पटकावलेली आहेत. यामध्ये आता मानाचा तुरा खोवला गेला असून बीड जिल्ह्यात आर.आर .(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार टोकवाडी ग्रामपंचायतने पटकावला आहे. परळी तालुक्याचा हा बहुमान असून परळी तालुक्यात टोकवाडी हे गाव स्मार्ट व्हिलेज ठरले आहे.

           26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय पातळीवरील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार (२०२१-२२) परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतने पटकावला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्काराचे स्वरूप 50 लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यासह बीडच्या जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी एम मोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ गोदावरीताई राजाराम मुंडे, परळीच पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, ग्रामसेविका सौ.सुनीता रांजणकर, उपसरपंच सौ.स्वाती अंगद काळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजाराम मुंडे, सौ. कल्पना मुंडे, सौ अलका नामदेव मुंडे, सौ. प्रियंका संतोष पारधे, नागनाथ काळे, अनिल काळे, प्रदीप रोडे, आजम शेख, सौ प्रमिला तुकाराम पारधे, आदींनी स्मार्ट व्हिलेज पुरस्कार स्वीकारला.

           गेल्या पाच सहा वर्षात टोकवाडी ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला असून स्वच्छ व सुंदर गाव निर्माण केले आहे. स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान यावर प्रामुख्याने भर देऊन काम केले. त्याचबरोबर स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी सुशोभीकरण, शौचालयांची व्यवस्था, डिजिटल शाळा, डिजिटल अंगणवाडी, घनदाट वृक्ष लागवड, मोफत पिठाची गिरणी, आरोग्य शिबिरे, सामाजिक सभागृहे, शिक्षण व आरोग्यावर भर, वीज व्यवस्थापन, लोकसहभागातून विविध विकास कामे, बंदिस्त नाल्या, सिमेंटचे रस्ते व गरजूंना वैयक्तिक लाभाच्या योजना असे चौफेर काम टोकवाडी ग्रामपंचायत ने उभे केले आहे. या कामाची पावती म्हणूनच आर. आर.(आबा)  पाटील सुंदर गाव पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. यापूर्वी टोकवाडी ग्रामपंचायतीला 2018 -19 मध्ये तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर सन 18-19 ला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्यातील द्वितीय क्रमांक तर विभागात तिसरा क्रमांक असा बहुमान मिळालेला आहे.

        टोकवाडी ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या काळातही विविध कामांसाठी निधीची मोठी उपलब्धता झाली. ज्येष्ठ नेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी मोठे सहकार्य मिळाले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम .मोकाटे, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय केंद्रे, विठ्ठल नागरगोजे, शिवाजी मुंडे, पंचायत समितीचे अधिकारी सर्व अभियंते, विस्तार अधिकारी,पंचायत समिती माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.तसेच सर्व गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रत्नेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, बचत गटाच्या महिला भगिनी आदींनी या सर्व कामांमध्ये सहकार्य केले. सर्वांचे सहकार्य व सहभागातूनच टोकवाडी ग्रामपंचायतने बहुमानाचा हा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार पटकावल्याचे ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजाराम मुंडे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार