उद्घाटनासाठी धनंजयजी गुडसूरकर यांची उपस्थिती

 स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह :सुप्रसिद्ध व्याख्याते अभय भंडारी, डॉ.विश्वाधार देशमुख, यांच्या व्याख्यानांचे आयोजन


 उद्घाटनासाठी  धनंजय गुडसूरकर यांची उपस्थिती


    परळी, दि. २४/०१/२०२४( प्रतिनिधी )


   येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.संस्थेचे अध्यक्ष संजय  देशमुख,सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या  या कार्यक्रमाचे उद्‌घाटन  धनंजय गुडसुरकर , (सदस्य महा .राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ . ) यांच्या शुभहस्ते आज दि.२४ / ०१ / २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. संपन्न होणार आहे . तसेच सायं. ६:०० वा . मा.अभय भंडारी (विटा - सांगली) यांचे 'रामायण,महाभारत आणि आजचे जीवन'या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केले आहे.यावेळी स्मृतिसमारोहानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल.

        उद्या दि.२५ /०१ / २०२४ सायं. ६:०० वा. डॉ. विश्वाधार देशमुख यांचे 'भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ ' या विषयावर विचारांची पेरणी करणारे हृदयस्पर्शी व्याख्यान आयोजित केले आहे.यावेळी स्मृतिसमारोहांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येईल. 

         दि.२६ /०१ / २०२४ सायं. ५ वा . *जल्लोष तरुणाईचा*  हा महाविद्यालयांतील विद्यार्थिनींच्या विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम होणार आहे 

   स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहानिमित्त होणाऱ्या वैविध्यपूर्ण विषयावरील व्याख्यानाने रसिक  मंत्रमुग्ध होतील असा सार्थ विश्वास आहे.महाराष्ट्रातील नामवंत अशा व्याख्यात्यांची व्याख्याने ऐकण्याची संधी या निमित्ताने परळी पंचक्रोशीतील रसिकांना उपलब्ध होत आहे.तरी या स्मृतिसमारोहातील  व्याख्यानास बहुसंख्य रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे.

असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. विद्या देशपांडे यांच्यासह सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड व संयोजन समितीतील प्रा.डॉ. राजश्री कल्याणकर ,डॉ. अरुण चव्हाण ,प्रा. विशाल पौळ , प्रा.क्षितिजा देशपांडे,प्रा.वीणा भांगे , इतर सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  केलेले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार