नमो चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात

   नमो चषक :पंकजा मुंडे, खा.डाॅ.प्रितम मुंडेंच्या हस्ते विजेत्यांनी स्विकारली  बक्षिसं

नमो चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात ; व्हाॅलीबाॅलच्या टीपीएस काॅलनी संघाने पटकावले २१ हजाराचे बक्षीस


परळी वैजनाथ।दिनांक २३।

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते रोख रक्कमेची बक्षीस देण्यात आली. व्हाॅलीबाॅल स्पर्धेत टीपीएस काॅलनी संघाने विजेतेपद पटकावले, हा  संघ २१ हजाराच्या बक्षीसाचा मानकरी ठरला.


   शक्तीकुंज वसाहतीमधील भेल स्कूलच्या केजी हाॅलमध्ये हा बक्षीस वितरणाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, भा.शि. प्र.संस्थेचे कार्यवाह हेमंत वैद्य, वसंतराव देशमुख, विकासराव डुबे, शांतीलाल जैन, रामभाऊ कुलकर्णी, अमरनाथ खुर्पे, विष्णुपंत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. बक्षीस वितरणापूर्वी भेल स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पंकजाताई व खा.प्रितमताई यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाले.


    नमो चषकमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळाला आहे, अशा स्पर्धा सातत्याने घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देऊ असं यावेळी पंकजाताई म्हणाल्या. खा.प्रितमताई यांनी विजयी स्पर्धकांचं अभिनंदन करून स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षक व परिक्षकांचे आभार मानले. नमो चषक स्पर्धेसाठी सहकार्य करणारे शिक्षक सर्वश्री अजय जोशी,विलास आरगडे  

विजय मुंडे, प्रा जगदीश कावरे, यशवंत कांबळे,विजय  बैंडसुरे,

चंद्रकांत  चाटे,पी टी  मुंडे तसेच रांगोळीचे परिक्षक सोनाली ठक्कर, किर्ती झंवर, कृष्णा बेंडे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.


*व्हाॅलीबाॅल स्पर्धेत टीपीएस काॅलनी संघाला विजेतेपद* 

------------

नमो चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेत टीपीएस काॅलनी संघाने विजेतेपद व सेव्हन फिटनेस हब संघाने उप विजेतेपद पटकावले, त्यांना पंकजाताई व खा.प्रितमताई यांच्या हस्ते अनुक्रमे २१ हजार व १५ हजाराचे रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले.   अन्य विजेत्यांना देखीव २ हजार ते १५ हजारापर्यंत बक्षीसं देण्यात आली. विजयी झालेले स्पर्धक पुढीलप्रमाणे *रांगोळी* - शुभांगी जातकर (प्रथम), दुर्गेश्वरी सोनपेठकर (द्वितीय), मैथिली लोंढे (तृतीय) *रस्सीखेच* सावित्री ग्रुप (प्रथम), फ्रेंड ग्रुप (द्वितीय), *मॅरेथॉन*

 *महिला गट* - संध्या भुतांगळे (प्रथम), पौर्णिमा बारड (द्वितीय), मनस्वी मुंडे (तृतीय), *ज्येष्ठ नागरिक गट*- साईनाथ आकलोड (प्रथम), भास्कर जाधव (द्वितीय), डाॅ. बालासाहेब कराड (तृतीय), *युवा गट* निखिल राठोड (प्रथम), विजय ढोबळे (द्वितीय), रूपेश राठोड (तृतीय), ज्येष्ठ महिला गट - स्वाती दहिफळे (प्रथम), मंदोदरी मुंडे (द्वितीय), सोनाली ममदापूरे (तृतीय), विशेष सत्कार- महादेवी ममदापूरे 


   व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी बेस्ट शुटर विशाल मुंडे, बेस्ट लेफ्टर राजू घुले, ऑल राऊंडर शंकर नागरगोजे व बेस्ट डिफेन्सर दिपक रेड्डी यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळकरी विद्यार्थी तसेच शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !