आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून मुंडेंचा सहभाग, जरांगे पाटलांच्या आंदोलनातही शिष्टाई

 अंबाजोगाईत मराठा समाजाच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार

आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून मुंडेंचा सहभाग, जरांगे पाटलांच्या आंदोलनातही शिष्टाई


अंबाजोगाई (दि. 28) - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात यश आल्यानंतर आज अंबाजोगाई येथे राज्य सरकारचे प्रतिनिधी व आरक्षणाच्या लढाईतील सक्रिय सहभाग घेतलेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेल्या आंदोलनास 26 जानेवारी रोजी मोठे यश प्राप्त झाले. महायुती सरकारने समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यामुळे महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडे यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला. 


धनंजय मुंडे यांनी राजकीय आयुष्यात सन 1999 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने कायम पाठिंबा दिलेला आहे. 2007 साली बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सर्वात प्रथम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा ठराव मांडून संमत करून घेतला होता. 


त्यानंतर देखील विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते असताना सकल मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी सहभाग घेतला होता. आरक्षणावरील त्यांची अनेक भाषणे राज्यभरात खूप गाजली होती. 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल नवी मुंबईतील वाशी येथे मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातल्या आंदोलनाला यश आले. राज्य सरकारने समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून कुणबी नोंदी व सगे सोयरे यासंदर्भातील राजपत्र हाती देत जरांगे पाटलांचे उपोषण मागे घेतले. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने जल्लोष केला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात राज्य सरकारच्या शिष्टमंडळात सहभागी होऊन धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवणे तसेच राज्य सरकारला निर्णयासाठी आवश्यक वेळ मिळवुन देण्याची शिष्टाई धनंजय मुंडे यांनी केली होती. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, याबाबत धनंजय मुंडे यांचा कायम आग्रह होता. 


त्याप्रित्यर्थ आज अंबाजोगाई तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, येडेश्वरी शुगर्सचे चेअरमन श्री.बजरंग सोनवणे,परळी विधानसभा अध्यक्ष श्री.गोविंद देशमुख, जेष्ठ नेते दत्ता आबा पाटील, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष श्री.तानाजी देशमुख,पक्षाचे नेते श्री.राजपाल लोमटे,केज विधानसभा अध्यक्ष श्री.बबन लोमटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंबाजोगाई चे उपसभापती लक्ष्मण करनर, संचालक श्री.अजित देशमुख, श्री.ताराचंद शिंदे,श्री.रामलिंग चव्हाण,श्री.गुणवंत आगळे, श्री.सत्यजित सिरसाट,जेष्ठ नेते पांडुरंग तात्या हारे,उपाध्यक्ष श्री.गोविंद पोतागंळे,सरचिटणीस आयुब शेख,श्री. विलास पाटील,श्री.अरूण जगताप,श्री.विलास मोरे,सरपंच मंगेश चव्हाण,दत्ता यादव,बंडु शिंदे,लिंबराज धुमाळ,शरद गित्ते,पपु गुजर,सरपंच लिंबराज धुमाळ,ज्ञानेश्वर गित्ते,सुधाकर सिनगारे,नामदेव शिंदे,अजित गरड,उपसरपंच भरत गाढवे,विठ्ठल कोकरे,शरद गंगणे,माऊली पाटील,राहुल देशमुख,काकासाहेब जामदार,महेश कदम,विशाल चव्हाण,लालासाहेब चव्हाण,किशोर फड,राजु आकसकर,गोटु थाटकर,शुभम लखेरा,अथर्व जोशी,पपु अदनाक,प्रविण देशमुख आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !