दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह व्याख्यानमाला

 रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ -अभय भंडारी


स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह व्याख्यानमाला   


परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)

     रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ असल्याचे प्रतिपादन अभय भंडारी यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजित श्यामराव देशमुख स्मृती समारोहात अभय भंडारी बोलत होते.

       या प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष संजय देशमुख तसेच सचिव रवींद्र देशमुख,कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी राम हा केवळ उपासनेचा विषय नसून तो एक विचार,आस्था आणि अस्मिता यांचा विषय असल्याचे सांगितले.

 आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊन श्यामराव देशमुख यांनी या संस्थेची उभारणी केली असे सांगून  महाविद्यालयाच्या जडणघडणीचा मागोवा आपल्या वक्तव्यात घेतला. यावेळी पुढे बोलताना अभय भंडारी यांनी सांगितले की, रामायण महाभारत आणि आजचे जीवन या विषयावर सविस्तर भाष्य केले. माणसाला आपले चरित्र घडवायचे असेल तर त्याने रामायणातल्या व महाभारतातल्या विषयाचे चारित्र्य घडविणारे संस्कार अंगीकारले पाहिजेत. या दोन महान ग्रंथामधील विचार हे अनेक पिढ्यावर सुसंस्कार करत आले आहेत आणि पुढेही करतील. संपत्ती मनुष्यावर स्वार झाली तर ती मनुष्याचा नाश करू शकते म्हणून संपत्तीला मनुष्यावर स्वार होता कामा नये. यासाठी प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे केला पाहिजे. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्या कथेच्या माध्यमाने शाब्दिक ज्ञान आणि त्याचे अनुष्ठान यामध्ये फारच मोठे अंतर असते हे त्यांनी दाखवून दिले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हनुमान आणि श्रीकृष्ण यांचा  बेस्ट डिप्लोमॅट म्हणून केलेला उल्लेख त्यांनी आवर्जून उद्धृत केला.याशिवाय रामायण व महाभारतातील अनेक कथांच्या सहाय्याने भगवद्गीतेतील श्लोकांच्या आधारे व विविध ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे त्यांनी अन्नशुद्धी, विचारशुद्धी, विवेकप्राप्ती अशा अनेक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ लक्ष्मीनारायण लोहिया ,  संस्थेचे संचालक हेमंत कुलकर्णी, मीनल लोहिया व विद्या देशमुख ,स्नेहा देशमुख तसेच  अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते .या व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर रांगोळी स्पर्धेतील  पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा डॉ अरुण चव्हाण व प्रा डॉ कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....