परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी

 ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नका: राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील चुकीचे पर्याय काढून टाका- बाजीराव भैया धर्माधिकारी




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील जातींचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र हे सर्वेक्षण करताना ब्राह्मण जातीच्या नोंदी करत असताना विनाकारण ब्राह्मणांची नसलेली वर्गवारी करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. हा एक प्रकारे ब्राह्मण जातीला विखुरण्याचा डाव असून शासनाने ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नये. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील ही चुकीचे पर्याय काढून टाका अशी मागणी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे राज्य समन्वयक तथा परळी वैजनाथ चे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केली आहे.


      महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पर्याय निवडताना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.दिलेल्या पर्यायात मी कोण? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात येत आहे. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कमी काळात हे सर्व्हेक्षण नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचेकडून करण्यात येत आहे.खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करताना ब्राम्हण कुटुंबीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावेळी ब्राम्हण कुंटुबीयाना प्रश्नावली मध्ये लाड ब्राम्हण, दैवज्ञ ब्राह्मण, भिक्षुकी ब्राह्मण, ब्रम्हभट, विश्व ब्राह्मण, जोशी ब्राह्मण असे सहा पर्याय दिलेले आहेत. हे संपूर्णतः चुकीचे आहे.अनेक ब्राह्मणांच्या शालेय दाखल्यावर हिंन्दू - ब्राह्मण असाच उल्लेख असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या पर्यायांचा अर्थ लावताना संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर पुन्हा पर्यायाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

        महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने याची दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये जातीच्या नोंदीत केवळ ब्राह्मण असाच एकमेव पर्याय ठेवला गेला पाहिजे ब्राह्मण जातीमध्ये कोणतीही वर्गवारी किंवा पोट जाती असा प्रकार नाही आयोगाने तात्काळ हे चुकीचे पर्याय या सर्वेक्षणातून काढून टाकावेत अशी मागणी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे राज्य समन्वयक तथा परळी वैजनाथ चे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!