वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !

 वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू ! 



-------------------------------

माजलगाव, दि.२५ (प्रतिनिधी)तालुक्यातील लोनगाव येथील सबस्टेशनला गेलेली वीज वाहक तर अंगावर पडल्याने जाग्यावरच होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली निपाणी टाकळी येथे घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तर ही निपाणी टाकळी येथून गेलेली आहे. याच गावातील रहिवाशी बालासाहेब वैजनाथ पांडे (वय ६५ वर्षे) हे त्यांच्या शेतातून दैनदिन काम आटोपून आज दि.२५ गुरुवारी पहाटे घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमी जवळ बालासाहेब पांडे आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तर अंगावर पडली, त्यातच त्यांचा होरपळून मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी सह पंचक्रोशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


महावितरण दुरुस्ती बाबत गंभीर ?

---------------------------


माजलगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहक तार, खांब हे धोकादायक परिस्थितीत आहेत. ह्यांच्या दुरुस्ती बाबत शेतकरी, ग्रामस्थ ह्यांच्याकडून तक्रार महावितरणकडे करून दुरुस्ती करण्यात येत नाही. निपाणी टाकळी येथील ही घटना जीर्ण व धोकादायक असलेल्या वीज वाहक तारे मुळेच झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार