अभिष्टचिंतन लेख:परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड

 परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड




        




    26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी भारताला स्वतःचे सार्वभौमत्व असलेले प्रजासत्ताक राज्य मिळाले. लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य. लोकशाहीच्या मार्गाने जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळख निर्माण करणारी, जगातील सर्वात सुंदर लिहिली गेलेली राज्यघटना संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला अर्पण केली.  त्या दिवसापासून भारतीय समाज रचनेचा गाडा हा राज्यघटनेच्या मार्फत सुरू झाला. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे 26 जानेवारी होय.

    कायद्यापुढे सर्व समान आहेत. स्वातंत्र्य, बंधूता, समता या महान विचारांची जपणूक करणारी, प्रत्येक भारतीयाला भारत देशा प्रति प्रेम प्रदान करणारी, भारत देशामधील प्रत्येक जाती-धर्माच्या माणसाला स्वतंत्रता बहाल करणारी, प्रत्येक भारतीयाला देश प्रेम शिकवणारी, देशाप्रती देश भावना चेतावणारी राज्यघटना भारताला बाबासाहेबांनी दिली.  या राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेला दिवस म्हणजे 26 जानेवारी. हा भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण. ऐतिहासिक दिवस. 

  26 जानेवारी हा रानबा गायकवाड यांचा जन्म दिवस.  गरिब परिस्थितीमध्ये, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जन्म घेऊन एका झोपडपट्टी विभागात राहून परळी परिसराच्या वैभवात भर घालण्याचे काम रानबा गायकवाड यांनी केले आहे.साहित्य,कला, नाट्य, सिनेमा, पत्रकारिता, सामाजिक कार्य, उत्कृष्ट व्याख्याता, उत्कृष्ट लेखक अशा कितीतरी क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे.आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात, कुत्र्याची अंडी ,क्रांतीसूर्याच्या दिशेने ही त्यांची पुस्तके खूप गाजली आहेत.तर भीमयुग नाटकातून रानबा गायकवाड यांनी बाबासाहेबांचे क्रांतीकारी विचार मांडले आहेत.

    साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःच्या अचाट कर्तुत्वाने केवळ मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रात आपल्या परळीचे नाव कोरले आहे.  साहित्य लेखनातून  मराठवाड्यातील अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, दलित, गरीब, पीडित, वंचित, बहुजन, आदिवासी, शेतकरी, मजूर, कामगार व तळागाळातील अडल्या नडलेल्या लोकांच्या प्रश्नावर, त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा, त्यावर वज्रमुठ आवळणारा, आपल्या पत्रकारतेच्या माध्यमातून असंख्य अन्यायग्रस्त माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारा, एक झुंजार पत्रकार.

    समाजातील अनेक विषयावर महत्वाचे लिखाण करणारा, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, भटक्या विमुक्त  यांच्या जीवनावर नाना प्रकारचे लेखन करून त्यांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम रानबा गायकवाड यांनी केले आहे.  परळी शहरातील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात सदैव सक्रिय असणारा, सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारा, आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने  शून्यातून अस्तित्व निर्माण करणारा, साहित्य, कला क्षेत्र, नाट्य, क्रीडा क्षेत्र, पत्रकारिता यांच्यामध्ये स्वतःच्या नावाची वेगळी छाप निर्माण केली आहे.  परळी शहराच्या अनेक विकास आंदोलनत, सामाजिक आंदोलनामध्ये , सक्रिय सहभाग नोंदवणारा, परळी भूषण हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार मिळवणारा, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा खंदा समर्थक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रत्येकाच्या तन-मन-धनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे.

   रानबा गायकवाड म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा एक अग्रणी कार्यकर्ता. ज्याच्या आई-वडिलांनी बीड जिल्ह्यामध्ये आपल्या गायनाच्या  माध्यमातून फुले शाहू आंबेडकर चळवळ सामान्य माणसाच्या घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम केलेले आहे.तो वारसा पुढे नेण्याचे काम रानबा गायकवाड यांनी केले. विद्यार्थी दशेत नामांतराच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन मराठवाडा विद्यापीठास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी जी आंदोलने झाली.त्यात ते सहभागी होते.

        दैनिक सम्राट  या पेपरच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. खेड्यापाड्यांमध्ये अनेक गोरगरीब लोकांच्या ॲट्रॉसिटीच्या केसेस न घेता त्यांना तसेच राजकीय बळाचा वापर करून प्रकरण दाबण्याचा  प्रयत्न झाला परंतु रानबा गायकवाड यांच्या पत्रकारितेमुळे अनेक लोकांना ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल करता आलेल्या आहेत. अनेक  वंचित घटकातील लोकांना, अन्यायग्रस्त लोकांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेले आहे. तर साप्ताहिक शिक्षण मार्गच्या  माध्यमातून अनेक विद्यार्थी, शिक्षक यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन घेण्याचा मानही त्यांच्याकडे जातो.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व त्यांच्या कार्यावरील भीमयुग हे क्रांतिकारी आंबेडकरवादी  नाटक त्यांनी प्रचंड ताकतीने उभे केलेले आहे.  परिवर्तनाची नांदी म्हणून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. रानबा गायकवाड यांनी नाट्यक्षेत्र, कलाक्षेत्र, पत्रकारिता, सामाजिक उपक्रम यात आपला ठसा उमटवला आहे. ते उत्तम वक्ते आहेत.विचिरवंत आहेत. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, आदी कार्यक्रमात त्यांची व्याख्याने होतात.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची कास त्यांनी लहानपणापासूनच धरलेली आहे.रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडलेली आहे. आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून रानबा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये स्वतःला झोकुन दिलेले आहे. पुरातन रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड यांच्याविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातूनआसूड ओढणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, प्रत्येक माणसाला न्याय मिळावा यासाठी सदैव कार्यरत असणारा एक जागृत पत्रकार. जागृत संपादक. फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक जाणता कार्यकर्ता.

    गरिबीची जाण असलेला, अत्यंत संयमी,शांत, मनमिळावू. प्रत्येकाशी आपुलकीचे  स्नेहाचे संबंध ठेवणारा. फुले शाहू आंबेडकर चळवळीचा  अभ्यासक. अनेक विषयावर प्रगल्भ असे लिखाण केलेला, सामाजिक चळवळीची नाळ असलेला व प्रत्येक कार्याला आपले स्वतःचे कार्य आहे असे समजून त्या कार्यामध्येही भाग घेऊन समाजकार्यात सक्रिय असलेला परळी परिसरातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजेच  रानबा गायकवाड.  समाज परिवर्तनाच्या लढाईत आपले अतुलनीय योगदान देणाऱ्या भीमयुगकार उपाधीसह अनेक पुरस्कार प्राप्त रानबा गायकवाड  यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा


          ✍️ दिलीप उजगरे

        प्रसिद्ध विधिज्ञ, परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार