राज्य मागासवर्ग आयोगाकडून ब्राम्हणांना विचारणा- "को अहम् "!

 राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात संभ्रमित करणारे पर्याय: ब्राह्मण समाजाला पडला प्रश्न ;नेमका मी कोण ब्राह्मण ?


परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....

        राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील जातींचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र हे सर्वेक्षण करताना ब्राह्मण जातीच्या नोंदी करत असताना विनाकारण ब्राह्मणांची नसलेली वर्गवारी करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाज संभ्रमित झाला आहे. या सर्वेक्षणात नोंद करताना स्वतःला माहीत नसलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मी कोण ब्राह्मण ? असा प्रश्न पडला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील ही चुकीचे पर्याय काढून टाकावेत अशी मागणी ब्राह्मण समाजातून होत आहे.

        राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पर्याय निवडताना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.दिलेल्या पर्यायात मी कोण? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात येत आहे. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कमी काळात हे सर्व्हेक्षण नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचेकडून करण्यात येत आहे.खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करताना ब्राम्हण कुटुंबीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावेळी ब्राम्हण कुंटुबीयाना प्रश्नावली मध्ये लाड ब्राम्हण, दैवज्ञ ब्राह्मण, भिक्षुकी ब्राह्मण, ब्रम्हभट, विश्व ब्राह्मण, जोशी ब्राह्मण असे सहा पर्याय दिलेले आहेत. हे संपूर्णतः चुकीचे आहे.अनेक ब्राह्मणांच्या शालेय दाखल्यावर हिंन्दू - ब्राह्मण असाच उल्लेख असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या पर्यायांचा अर्थ लावताना संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण करणाऱ्या प्रकरणात कर्मचाऱ्यांनाही अवघड काम होऊन बसले आहे दरम्यान समाजातील वयोवृद्ध ज्येष्ठांना सुद्धा ब्राह्मणात ही वर्गवारी असते याचा शोध हे सर्वेक्षण करताना लागत आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षण नोंदीमध्ये हे पर्याय कुठून आले अशा पद्धतीने सोशल मीडिया वरूनही या मुद्द्याचे साधक-बाधक चर्चा घडताना दिसत आहे त्याचबरोबर हे चुकीचे पर्याय रद्द करावे असे मागणी ब्राह्मण समाज संघटनातून होत आहे.


■ 

    जवळपास सर्व ब्राह्मण समाज बांधवांच्या अधिकृत टिसीवरील नोंदी या 'हिंदू ब्राह्मण' अशाच आहेत. असे असताना विनाकारण ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नका. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील चुकीचे पर्याय काढून टाकावेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने याची दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये जातीच्या नोंदीत केवळ ब्राह्मण असाच एकमेव पर्याय ठेवला गेला पाहिजे ब्राह्मण जातीमध्ये कोणतीही वर्गवारी किंवा पोट जाती असा प्रकार नाही आयोगाने तात्काळ हे चुकीचे पर्याय या सर्वेक्षणातून काढून टाकावेत. 

- बाजीराव भैया धर्माधिकारी

ब्राह्मण समाज संघर्ष समिती राज्य समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !