परळीचे भूमिपुत्र असलेल्या मराठी उद्योजकाचे ॲल्‍युमनिअम कास्टिंगद्वारे आत्‍मनिर्भर भारतासाठी मोठे योगदान

 अयोध्येच्या अमृत भारत रेल्वेला पुण्याच्या तौराल इंडिया कंपनीचे गिअर बॉक्स!


परळीचे भूमिपुत्र असलेल्या मराठी उद्योजकाचे ॲल्‍युमनिअम कास्टिंगद्वारे आत्‍मनिर्भर भारतासाठी मोठे योगदान

 

पुणे : ‘तौराल इंडिया’ ही जागतिक पातळीवर एकात्मिक अल्‍युमिनियम धातूओतकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी आता भारतीय रेल्‍वेसोबतही काम करत असून, देशाला अद्‌यावत तंत्रज्ञानाच्या उपलब्‍धीसह देश आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासात ही कंपनी एक मैलाचा दगड ठरावा, इतपत आपले योगदान देत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या अयोध्या येथील अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेसाठी पुण्यातील ‘तौराल इंडिया’ या मराठी उद्योजकाच्या कंपनीने ॲल्‍युमनिअम कास्टिंग सोल्यूशन पुरवले आहे. या अमृत भारत रेल्वेसाठी तौराल इंडियाने गिअर बॉक्सची निर्मिती केली. यापूर्वी हे तंत्रज्ञान व उत्पादने जर्मनीहून आयात करावी लागत होती, अशी माहिती तौराल इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक भरत गिते यांनी दिली.


WAP5 या इलेक्ट्रिक लोकोमोटीव वर्गवारीतील इंजिनची निर्मिती हा एक रेल्वे विभागाचा महत्वाचा उद्योग आहे. या प्रकारच्या इंजिनची निर्मिती पश्चिम बंगालमधील चित्तरंजन लोकोमोटीव वर्क्स (CLW) मध्ये होते. या लोकोमोटीवसाठी लागणारे ॲल्‍युमनिअम गिअर केसेसचे उत्पादन देशातच करण्याच्या अभियानाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका ‘तौराल इंडिया’कडून अदा करण्यात येत आहे. ज्यामुळे केवळ जर्मनीतून ॲल्‍युमनिअम कास्टिंगसाठी लागणाऱ्या घटकाची होणारी आयातच थांबली.


 ‘तौराल इंडिया’ ही मराठी उद्योजक भरत गिते यांनी चाकण एमआयडीसीमध्ये सुरु केलेली कंपनी आहे. याविषयी ते म्हणाले की, भारतीय रेल्वे सोबत काम करताना ‘तौराल इंडिया’ परस्परात झालेल्या कराराच्या पुढे जाऊन मेक इन इंडियासारख्या अभियानाबरोबरच तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण, नाविन्यपूर्णता आणण्याप्रती बांधील आहे. ॲल्‍युमनिअम कास्टिंग सोल्युशनचे सुटे घटक जागतिक पातळीवरील गुणवत्तेचे निकष पाळून कोणत्याही तडजोडी न करता किफायतशीर दरामध्ये आणि मुबलक प्रमाणात आम्ही उत्पादित करू शकलो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे.


‘तौराल इंडिया’ने देशात तांत्रिक ज्ञान आणि क्षमता धोरणात्मकरीत्या विकसित केल्या आहेत त्याअनुषंगाने  रेल्वे क्षेत्राच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यात की-प्लेअरची भूमिका ‘तौराल इंडिया’ बजावत आहे. पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी मध्ये कंपनीचा ॲल्‍युमनिअम सँड कास्टिंग सोल्युशन प्लांट सुमारे ३ लाख चौरस फूट क्षेत्रात विस्तारला आहे. ज्‍यात उत्‍पादनाच्या संकल्‍पनेपासून ते क्‍वालिटी टेस्‍टिंग, पेंटिंग, उत्‍पादनाची बांधणी, उत्‍पादनाची जुळणी आणि त्‍याचे वितरण अशी विविध कामे एकाच ठिकाणाहून होत असतात.

ॲल्‍युमनिअम उत्‍पादनांसारखी ग्रीन मेटल्‍सध्ये काम करताना त्‍यांच्या प्रोसेसिंग आणि ॲप्लिकेशन्सदरम्‍यान कमीत कमी प्रदूषण आणि कार्यक्षम उर्जावापर होण्यासह त्‍याच्या जीवनसाखळी दरम्‍यान कार्बन फूटप्रिंट कमी असते. त्‍याचप्रमाणे इतर धातूकामाच्या तुलनेत उत्‍तम मजबुतीबरोबर कमी वजन, उत्‍कृष्‍ट गंजरोधक, लवचिकतेमुळे कोणत्याही आकारात उत्पादन घेता येणे, पुनर्प्रक्रिया आणि ऊर्जेचा कार्यक्षम वापर यामुळे ग्रीन मेटल्स रेल्वेशी निगडित विविध उत्पादनमध्ये आधिक महत्वाचे ठरत आहे.


‘तौराल इंडिया’ ॲल्‍युमनिअम कास्टिंग सोलुशन चे फायदे केवळ रेल्वे सेक्टर पुरते मर्यादित राहिले नाहीत तर त्या पुढे जाऊन सागरी क्षेत्र, एरोस्पेस, ऊर्जा क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्र, आरोग्य क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या उत्पादन क्षेत्रामध्ये त्याचा चांगला उपयोग होत आहे. साहजिकच ऑर्डिनेस फॅक्टरी (डिफेन्स), एबीबी, जनरल इलेक्ट्रिक सायमन आणि हाय सांग सारख्या इतर अनेक मोठमोठ्या कंपन्यानी ‘तौराल इंडिया’ला सामावून घेतले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !