शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सुतार यांची निवड

 शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सुतार यांची निवड




परळी वैजनाथ, शिक्षण विवेक आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा, नगरपालिका शाळा, खासगी अनुदानित शाळा या शाळातील उपक्रमशील युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी "शिक्षण माझा वसा पुरस्कार २०२४"  या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी एकूण सहा विभागातून नामांकने मागविण्यात आले होते. यामध्ये भाषा, गणित, विज्ञान, कला, तंत्रज्ञान आणि उपक्रमशील मुख्याध्यापक या सहा विभागांचा समावेश असून प्रत्येक विभागातून एका शिक्षकाची या प्रमाणे सहा शिक्षकांची निवड राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.


यामध्ये परळी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नागापुर येथील उपक्रमशील  शिक्षक श्री. संतोष अंबादासराव सुतार यानी सादर केलेला नवोपक्रम "मी बुद्धिमान - डिजिटल स्वयं अध्ययनमाला" या उपक्रमाची दखल घेत तंत्रज्ञान या विभागातील पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अभिनंदन पत्राद्वारे कळविले आहे.

या पुरस्काराचे वितरण स. भ. मोहनबुवा रामदासी, मठाधिपती खआतगआव यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सामर्थ्य आहे चळवळीचे' या थीम वर आधारित भव्य कार्यक्रमात दि. 28 जानेवारी 2024 रोजी भावे नाट्यमंदिरात, सांगली येथे होणार आहे.


श्री संतोष सुतार यांच्या "मी बुद्धिमान डिजिटल स्वयं अध्ययनमाला" या नवोपक्रमास मागील वर्षी जिल्हा स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सर्वद्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता आणि राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत 'टॉप टेन नवोपक्रमात' त्याचा समावेश झाला असून SCERT, पुणे च्या वेबसाईटवर त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.


या स्वयं अध्ययन मालेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतः च्या गतीने स्वतः शिकू शकतो तसेच शिक्षक दुरस्थ पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आणि मुल्यमापन ही करू शकतात. पाठ्यघटकाच्या स्पष्टीकरणाच्या छोट्या छोट्या व्हिडिओ आणि गुगल फॉर्म यांची एकमेकांशी सांगड घालून तयार केलेल्या या साधनात विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केला तर पुढे जाण्याची संधी मिळते आणि चुक झाली तर पुन्हा तेच शिकण्याची संधी मिळते या पद्धतीने विद्यार्थी चुकत - शिकत, स्वतः च्या गतीने अंतीम ध्येय प्राप्त करतो आणि याबद्दल त्याला डिजिटल सन्मान पत्राने सन्मानित पण करण्यात येते.


अशा या नवोपक्रमाची दखल घेत संतोष सुतार यांना शिक्षण माझा वसा या राज्य स्तरीय युवा पुरस्कारासाठी तंत्रज्ञान या विभागाचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी परळी - वै. श्री. कनाके साहेब, केंद्रप्रमुख श्री. गुहाडे साहेब, मुख्याध्यापक श्री. अरुण गायकवाड सर, सर्व शिक्षक, नागापुर येथील शिक्षण प्रेमी नागरीक यांनी कौतुक केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार