खा.प्रितम मुंडे यांनी दिव्यांगांना दिला विश्वास
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आणि सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
;पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना केले निःशुल्क साहित्याचे वाटप
गेवराई । दि. २८ ।
जन्मतः दिव्यांगत्वाची विशिष्ट शक्ती लाभलेल्या दिव्यांग बांधवांचे जीवन कष्टमुक्त करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनांचा लाभ बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना एका छताखाली मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. गेवराई येथे आयोजित निःशुल्क सहायक साधनांच्या वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत गेवराई तालुक्यातील दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते निःशुल्क सहायक साधनांचे वितरण करण्यात आले. गेवराईचे आमदार लक्ष्मन पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग थडके, जेडी शाह, दीपक सुरवसे, शाम कुंड,ज्ञानेश्वर खाडे, गहिनीनाथ पालवे, गणेश मुंडे, निलेश सानप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग' हा सन्मानजनक शब्द प्रचलित करून दिव्यांगांना स्वाभिमान मिळवून दिला आहे, सोबतच दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी देखील प्रधानमंत्री मोदी आणि केंद्र सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आम्ही केंद्र सरकार आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे, केंद्र सरकारच्या या योजनेमुळे दिव्यांगांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाले आहे. या सेवेत सातत्य ठेवत असताना बीड जिल्ह्यातील रुग्णालयात दर महिन्याला एक दिवस राखीव ठेवून दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सुलभ प्रक्रियेद्वारे मिळावे यासाठी देखील मी प्रयत्न करत असल्याचे खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या. तसेच राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
••••
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा