गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास

 गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास




मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे ते चेहरा बनले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटीत ३१ ऑगस्टला कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे यांचं नाव मोठ्या पातळीवर प्रकाशझोतात आलं. मनोज जरांगे यांनी सातत्यानं विषय लावून धरत त्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात मनोज जरांगे यांची ओळख गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास झाला आहे.


गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास


मनोज जरांगे पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरील छोटी मोठी आंदोलनं त्यांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत होते. मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातील आंतरवाली सराटीत होत असलं तरी मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे आहेत. मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग अंबड, घनसावंग आणि गेवराई तालुक्यात आहे. या भागातून गोदावरी नदी वाहते. यालाच गंगथडी म्हणतात. मनोज जरांगे गेल्या १५ वर्षांतील आंदोलनांमुळं गंगथडीचे नायक बनले होते. मराठा आरक्षण आंदोलन उभारणी करताना त्यांनी दोन महिने गंगथडीच्या आजूबाजूच्या १२३ गावांमध्ये सभा घेत शहागड येथे रास्ता रोको केला होता.
ग्रामीण भागातील मराठा शेतकरी शेतमालाचे भाव कोलमडल्यानं किमान कुणबी नोंदींद्वारे जात प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळाल्यास शैक्षणिक शुल्क कमी होईल आणि नोकरीत आरक्षण मिळेल या आशेने मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांचं निवेदन सरकारतर्फे तीन मंत्र्यांनी स्वीकारावं अशी त्यांची मागणी केली होती. ती मान्य न झाल्यानं मनोज जरांगे उपोषणाला बसले पुढे ते आंदोलन चिघळलं आणि लाठीचार्जनंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आलं.

माध्यमांसमोर चर्चेच धोरण


मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरातील महसूल खात्यातील कागदपत्रांमध्ये असलेल्या कुणबी नोंदींची तपासणी सुरु झाली. राज्य सरकारनं न्या. शिंदे यांची समिती स्थापन केली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कुणबी नोंदी शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान अनेकांच्या कुणबी नोंदी समोर आल्या. मात्र, राज्य सरकारनं मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवताना सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची विनंती मान्य केली होती. मात्र, त्याची अमंलबजावणी होत नव्हती. मात्र, अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा त्यांनी काढला. अखेर नवी मुंबईत मनोज जरांगे आंदोलकांसह पोहोचले आणि राज्य सरकारनं कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबतचं राजपत्र सरकारनं प्रसिद्ध केलं, अशा रितीनं मनोज जरांगे यांचा गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा पूर्ण झाला.मनोज जरांगे यांनी सप्टेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना ती माध्यमांसमोर केली. दरम्यानच्या काळात ते आरक्षण घेतल्याशिवाय घरी देखील जाणार नाही म्हणाले होते. आता राज्य सरकारनं सगेसोयरेची मागणी मान्य केल्यानं जरांगे आता त्यांच्या घरी जातील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार