पोस्ट्स

वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे  वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे  यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर  , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.       यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे असून मानवाच्या शाश्वत विकासासाठी त्या

ऑनलाईन 'बिंगो' जुगार खेळवणारांवर व खेळणारांवर धाड टाकून कारवाई

इमेज
ऑनलाईन 'बिंगो' जुगार खेळवणारांवर व खेळणारांवर धाड टाकून कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अंबाजोगाई येथील पथकाने परळी शहरातील विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून कारवाई केली. यामध्ये बसस्थानक परिसरात चालविल्या जाणाऱ्या ऑनलाईन 'बिंगो' जुगार केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी वै. बसस्थानकासमोरील एका चहाच्या हॉटेलच्या बाजुस असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये दि.24 रोजी दुपारी 4.30 वा. काही लोक संगणकावरील आकड्यावर पैसे लावुन विनापरवाना बेकायदेशीररित्या ऑनलाईन बिंगो नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना मिळून आले.         याप्रकरणी 1) मुंजा ऊर्फ मुन्ना पांडुरंग तौर वय 24 वर्षे रा. वडसावित्री गल्ली परळी वै, जुगार खेळणारे इसम नामे 2) मोसीन हाबीब शेख वय 33 वर्षे रा. हबीबपुरा परळी वै, 3) आसीफ दस्तगीर शेख वय 22 वर्षे रा. हबीबपुरा परळी वै 4) सय्यद वसीम सय्यद नबी वय 32 वर्षे रा. मलीकपुरा परळी वै, 5) राधाकीशन मारोती देवकते वय 55 वर्षे रा. लोणी ता. परळी वै. हे स्वतःचे तसेच बिंगो जुगार माल

original papu playing pictures

इमेज
original papu playing pictures : चित्रांचा 'सोरट' जुगार खेळवणारा व खेळणारांवर पोलीसांची कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         विविध चित्रांच्या रकान्यात पैसे लावायचे अन् बंद चिठ्ठीत निघणाऱ्या चित्रांवरुन जुगाराच्या नियमानुसार पैसे द्यायचे किंवा डुलवायचे अशा प्रकारचा चित्रांचा 'सोरट' जुगार खेळवणारा व खेळणारांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी वै. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्तरेला पत्र्याच्या मोकळ्या तंबूखाली दि. 24 जुन रोजी दुपारी 2.50 वा. सुमारास काही लोक हे विनापरवाना बेकायदेशीरित्या सोरट नावाचा जुगार खेळत होते.चित्रावर पैसे लावुन लोकांकडून पैसे घेवुन स्वतःच्या फायद्यासाठी खेळत व खेळवित असताना पोलीसांना मिळुन आले.           याठिकाणी अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अंबाजोगाई यांच्या पथकाने कारवाई केली.या कारवाईत इंग्रजी मध्ये original papu playing pictures असे नाव असलेला एक गुलाबी रंगाचा पेपरचा चार्ट मिळाला. पोत्याखाली छत्री, हॉलीबॉल, सुर्य, दिवा, गाय, बकेट, पतंग, भवरा, गुलाबाचे फुल, फुलपाखरू,

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

इमेज
  श्री क्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी वन विभागाकडून 4 हेक्टर जमीन गडाला हस्तांतरित करण्यास केंद्रीय वन विभागाची मान्यता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, यात्री निवास, वाहनतळ इत्यादी कामे केले जाणार केंद्रीय वन विभागाचे व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मुंडेंनी मानले आभार मुंबई (दि. 24) - श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे.  भगवान गडाचे महंत न्यायाचार्य,  ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सदर जमीन वन विभागाकडून हस्तांतरित करून भगवानगडाच्या विकास कार्यासाठी देण्यात यावी, याबाबत धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्य शासनास व केंद्र शासनास विनंती केली होती.  भगवानगडाच्या परिसरातील या जमिनीवर रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद

पंकजा मुंडेंविषयी इन्स्टाग्रामवर पुन्हा अत्यंत अश्लील प्रतिक्रिया:परळीत एकाविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
पंकजा मुंडेंविषयी इन्स्टाग्रामवर पुन्हा अत्यंत अश्लील प्रतिक्रिया:परळीत एकाविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा...      भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर अत्यंत अश्लील प्रतिक्रिया व्यक्त करुन जाणीवपूर्वक भावना दुखवणे व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल माध्यमावर व्यक्त होणाऱ्या  एकाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि. 23/06/ 2024 रोजी रात्री 08.00 वा. आरोपी इन्स्टाग्राम आयडीधारक अभी तळेकर ( abhi_talekar_1010) याने इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडे यांचे विषयी अत्यंत अश्लील शब्दांत एक प्रतिक्रिया (comment) टाकली. यामुळे भावना दुखावल्या जाणार आहेत तसेच दोन जातीमध्ये किंवा दोन गटात द्वेषाची भावना निर्माण हाईल याची कल्पना असताना देखील जाणीवपुर्वक इंस्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकली. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातील कर्मचारी  पवन केशव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुरनं. 93/2024 कलम 153 (अ), 505 (2) भादवी सह कलम 67 IT Act  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

✍️ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची विशेष लेखमाला:चला हो पंढरी जाऊ......!

इमेज
  चला हो पंढरी जाऊ.....   ✍️ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर --------‐--------------------------------------------‐- पं ढरीची वारी हा संपूर्ण मराठी मनाचा सांस्कृतिक सोहळा झाला आहे. जात, धर्म, वंश, वर्ण विसरून लाखो लोक एका सावळ्या पाडुरंगाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालतात. सर्वांनाच वारीला जात येईल असे नाही. जाता नाही आले तरी ही वारी समजून घेऊया.... संत विचारांचा  जागर करूया..... --------‐--------------------------------------------‐- ● गात जा गा गात जा गा । प्रेम मागा विठ्ठला ।।         अशी प्रेमाची साद घालीत शेकडो दिंड्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. कुणाचेही निमंत्रण नाही आणि कुणाचेही नियंत्रण नाही. तरीही लाखोंचा हा समूह दररोज आपला मुक्काम बदलत पायी वाटचाल करतो. या प्रवासात कुणी कुणाला जात विचारीत नाही. कुणी कुणाला धर्म विचारीत नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आलास म्हणून विचारीत नाही, कुणी कुणाला स्त्री अथवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश यातून आलेली मंडळी पण एकमेकांशी एकजीव होऊन जातात. २२

आ.धीरज देशमुखांचे पत्र

इमेज
  मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवा: आ.धीरज देशमुखांचे पत्र मराठा आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून चर्चा घडवावी, अशी मागणी  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. या मागणीचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांना गुरुवारी दिले. पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत होत आहे. मराठा समाजाच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि सगे-सोय-यांच्या निकषात बसणारे आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागत आहे. सरकार या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशनातील एक दिवस मराठा आरक्षणासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. यावर्षी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले, त्यातील तरतुदी आणि जानेवारीमध्ये वाशी येथे जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या अश्वसानामध्य

मुला मुलींना घेतले दत्तक

इमेज
  मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या देठे कुटुंबीयांना मंत्री तानाजी सावंत यांनी दिला आधार  मराठा समाजाच्या सुख दुःखात कायम पाठीशी राहणार- मंत्री प्रा. तानाजी सावंत पुणे,(प्रतिनिधी):- मराठा आरक्षणासाठी नुकतीच आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना राज्याचे कुटुंब व कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी सांत्वन पर भेट देऊन त्या कुटुंब यांना आधार देत 5 लाख रुपये सुपूर्द केले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या सुखदुःखात आपण कायम पाठीशी राहणार असल्याचे कुटुंब बालकल्याण मंत्री मराठा भूषण प्राध्यापक तानाजी सावंत यांनी सांगितले.  वाघोली, पुणे येथे मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कै.प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजी सावंत यांनी भेट घेत सांत्वन केले. त्या कुटुंबाला पाहता क्षणी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांना अश्रू अनावर झाले. समाजाप्रती असलेला कळवळा व समाजाला मदत करण्याची दानत त्यांनाच असते. ज्यांना आपल्या मातीला व समाजाला बसलेल्या चटक्याची जाण असते. याचीच प्रचिती येत आहे. मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आजपर्यंत

शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध

इमेज
  शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध महामार्ग रद्द अधिसूचना सरकारने काढावी; बाधित शेतकऱ्यांची मागणी परळी / प्रतिनिधी पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ मार्गास राज्यात शेतकऱ्यांना कडाडून विरोध होत असून राज्य सरकार हा प्रस्तावित महामार्गास स्थगिती दिल्याचे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे.स्थगिती नकोय महामार्ग रद्द करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात यावी अन्यथा बाधित शेतकरी आपल्या कुटूंबासह हे आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा परळी-अंबाजोगाई येथील बाधित शेतकऱ्यानी सरकारला दिला आहे. नागपूरपासून गोव्यादरम्यान महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे जोडण्यासाठी, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी मागणी नसताना देखील समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आणखी लांब पल्ल्याचा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आला होता.राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या उभारणीस तब्बल 86 हजार कोटी खर्च येणार असून या महामार्गासाठी 27 हजार एक्कर पेक्षा अधिक शेतजमीन शासन संपादित करणार आहे.नागपूर-रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना देखील हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांच

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'

इमेज
  फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'     लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभवही भाजपाला मोठा धक्का देणारा ठरला. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. पंकजा मुंडे यांना आणि ओबीसी समाजाला प्रातिनिधीत्व देणं गरजेचं असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.        लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेवर पाठवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या समर्थकांकडून पक्षश्रेष्ठींना विनंती केली जात आहे. दरम्यान राज्यसभा किंवा आता ज्या कोणत्या जागा रिक्त होतील, तेव्हा पंकजा मुंडेंची वर्णी लावावी, अशी विनंती फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे क

परळी आगाराकडून विद्यार्थ्यांनीना शाळेतच प्रवास पास वाटप

इमेज
  विद्यार्थ्यांचा प्रवास एसटीच्या मदतीने होणार सुखकर ●परळी आगाराकडून विद्यार्थ्यांनीना शाळेतच प्रवास पास वाटप परळी / प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या विविध सवलतीच्या योजना पासून शाळा आणि शालेय विद्यार्थी दूरच राहिले आहेत त्यामुळे यावर्षी बीड विभागातील परळी वैजनाथ एसटी आगाराकडून विद्यार्थी प्रवास पास सवलतीसह अनेक सवलतींच्या योजनांची माहिती प्रत्येक शाळेत पोहोचवली जात आहे परिणामी विविध प्रवासांच्या योजना विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षकांना समजण्यास मदत मिळत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास आता सुखकर होण्यास मदत होणार आहे. जूनच्या मध्यावर शाळा सुरू होतात ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मासिक प्रवास पास करिता मोठी गर्दी होत असते. पाचवी ते बारावीपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही योजना विद्यार्थिनी साठी मोफत पास योजना असल्याने या योजनेस प्रतिसाद चांगला मिळतो. या योजनेशिवाय विद्यार्थी आणि शाळा पर्यंत एसटी महामंडळाच्या इतर प्रवासाच्या सवलतीची माहिती पोहोचली जात नव्हती परिणामी विद्यार्थी वर्ग याबाबत अनभिज्ञ राहत होता मात्र याबाबत परळी वैजनाथ एसटी आगाराच

श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 1 जुलै रोजी परळी शहरात आगमन

इमेज
 श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 1 जुलै रोजी परळी शहरात आगमन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवार दि.01 जुलै 2024 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे. शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असुन येत्या 1 जुलै  सोमवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहरातील अग्रवाल लॉज, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक मार्गे जगमित्र नाना मंदिर ह्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. सोमवार सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची  देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत (मो.9850771177), विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित भोयटे,  रामकिश

भावपुर्ण श्रद्धांजली.......

इमेज
अयोध्येतील श्रीरामलल्ला  प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य विधीचार्य लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा अयोध्येतील राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य विधीचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आचार्य मागील काही दिवसांपासून आजारी होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात १२१ पुरोहीतांनी सहभाग नोंदवला. या पुरोहितांचे नेतृत्व लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं होतं. आज सकाळी ६.४५ वाजता दीक्षित यांचं निधन झालं. त्यांचा मृतदेह सध्या घरी असून मणिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.           त्यांच्या निधानाने काशीसहित देशभरातील भक्तांवर शोककळा पसरली आहे. पं.आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांचं निवासस्थान मंगलागौरीहून निघणार आहे. आचार्य लक्ष्मीकांत यांचा सामावेश काशीतील मोठ्या पंडितामध्ये होतो. त्यांची भारतीय सनानत संस्कृती आणि परंपरेवर प्रचंड उच्चकोटीची आस्था होती. लक्ष्मीकांत हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद कॉलेजचे वरिष्ठ आचार्य होते. या कॉ

परळीतील प्रख्यात प्रखर हिंदुत्ववादी डॉ. प्रकाश डुबे यांचे निधन

इमेज
  परळीतील प्रख्यात प्रखर हिंदुत्ववादी डॉ. प्रकाश डुबे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...               परळी शहर व परिसरातील सर्व परिचित असलेले जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉक्टर त्याचबरोबर प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले डॉ. प्रकाश डुबे यांचे आज (दि.२२ )सकाळी पावणेदहा वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.             डॉ. प्रकाश रामचंद्रराव डुबे हे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व होते. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे डॉक्टर म्हणून त्यांचा सर्वांनाच परिचय आहे. हिंदू धर्म संस्कृती, धर्माचरण, योग व वैदिक सनातन हिंदू धर्म तत्त्वाचे प्रखर पुरस्कर्ते म्हणून त्यांनी आपली वाटचाल केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही ते सक्रिय होते. आपली वैद्यकीय सेवा बजावतानाच प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करून त्यांनी धर्म व संस्कृती रक्षणाचे अनमोल कार्य केलेले आहे. डॉ. प्रकाश डुबे यांना आज सकाळी ९.४५  वा.सुमारास राहत्या घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 74 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी,

अभिनव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सहज योग कार्यक्रम

इमेज
  अभिनव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सहज योग  कार्यक्रम परळी . प्रतिनिधी .ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहज योग कार्यक्रमांतर्गत साजरा करण्यात आला .या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव पवार व्यासपीठावर उपस्थित होते तसेच सहज योग  याचेयोग साधक वैजनाथ शिरसाट सखाराम किटाळे राजाराम देशमुख सुजित कुंभार व शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मुंढे हे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती ची पूजन उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आजच्या योग दिवसाच्या प्रस्ताविक शाळेतील सहशिक्षक सिताराम गुट्टे यांनी मांडले सहज योग या अंतर्गत वैजनाथ शिरसाट व सखाराम किटाळे सर यांनी योगासनाचे जीवनातील महत्त्व ,ध्यानधारणेचे महत्त्व व शरीराचा विकास होण्यासाठी योगासनाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले विद्या

राज्याच्या प्रमुखांनी ओबीसी आंदोलनाला भेट देऊन बहुजनांना सन्मान द्यावा

इमेज
  सत्तेच्या दबावाखाली चुकीचे दाखले दिले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करा मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक ; पंकजाताई मुंडे यांची मागणी राज्याच्या प्रमुखांनी ओबीसी आंदोलनाला भेट देऊन बहुजनांना सन्मान द्यावा मुंबई ।दिनांक २१। सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज ट्विटद्वारे सरकारकडे केली.    सहयाद्री अतिथीगृहात आज राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक सरकारने बोलावली होती. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात ही बैठक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पंकजाताई मुंडे यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.    लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या उपोषणा संदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत सरकारकडे मागणी केली आहे ,त्या म्हणाल्या, राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंच

डॉ. संतोष मुंडे यांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद !

इमेज
  डॉ. संतोष मुंडे यांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद ! राज्याचे कृषी मंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जागा वाढीसाठी प्रयत्न करणार : डॉ संतोष मुंडे परळी : प्रतिनिधी....       राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली असून,भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा पाहावयास मिळत आहे, परळी येथील साई स्पोर्ट्स अकॅडमी परळी येथे राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी भेट देऊन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विविध विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे डॉ मुंडे यावेळी म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून तरुण हे पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते, राज्य शासनाने भरतीची घोषणा केली परंतु जागेचा आणि भरतीतील उमेदवार यांची तफावत पाहता जागा अत्यंत कमी असल्याचे पाहावयास मिळत आहे.  महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 रिक्त पदांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात मैदानी चाचणी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज प

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात  परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)           येथील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.        कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, संचालिका छाया पत्की, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम ज्योती जुनाळ, द्वितीय मधुरा पोखरकर, तृतीय मयुरी गोरे तर कला शाखेतून प्रथम ऋतुजा कुंभार, द्वितीय प्रिती कुंभार, तृतीय विद्या गंगाधरे यांचा व पालकांचा शाल, पुष्पगुच्छ, मेडल देवून सत्कार करण्यात आला.      तसेच महाविद्यालयातील विविध विषयात पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावल्या बदल गिफ्ट देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा डॉ विनोद जगतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल

मनःशांतीसाठी योग महत्वाचा

इमेज
आंतरराष्ट्रीय योग दिन: महाराष्ट्राची रणरागिणी बनली योगिनी ! पंकजाताई मुंडे यांचं युट्यूब लाईव्ह ; ३५ हजारांहून अधिक व्हुअर्सनी नोंदवला सहभाग विविध प्रकारच्या योगांचे दिले धडे ; सामाजिक प्रबोधनही केलं मुंबई  ।दिनांक २१।  राजकारण, समाजकारणासह सोशल मिडियावरही सतत सक्रिय असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त युट्यूब लाईव्ह वरून कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या योगांचे धडे दिले. राज्यभरातील सुमारे ३५ हजारांहून अधिक व्हुअर्सनी या युट्यूब लाईव्ह मध्ये सहभाग घेतला होता.    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  आज कुठल्याही जाहीर कार्यक्रमात सहभाग न घेता पंकजाताई मुंडे यांनी एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने योग दिन साजरा करण्याचे ठरवले. खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या जीवनात योगाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. देशाचा हा प्राचीन ठेवा आज संपूर्ण जगाने स्विकारलायं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यात सहभागी होत असल्यामुळे संपूर्ण जगात याचा अधिक वेगाने प्रसार झाला. योगामुळे शरीरा बरोबरच आतील अवयवांचा देखील व्यायाम होतो तसेच आत्म्य

योगामुळे शाश्वत सुखासोबतच इह-परलोक साधतो !- गुरुकुलात "योगदिन" कार्यक्रमात स्वामी विद्यानंदजी यांचे विचार

इमेज
योगामुळे शाश्वत सुखासोबतच  इह-परलोक साधतो !- गुरुकुलात "योगदिन" कार्यक्रमात स्वामी विद्यानंदजी यांचे विचार    परळी वैजनाथ,दि.२१(प्रतिनिधी)--                          समस्त शारीरिक व्याधी व मानसिक विकारांना नाहीसे करून जीवनात शाश्वत सुखाची प्राप्ती करण्याची गुरुकिल्ली म्हणजेच योगाचे अनुष्ठान होय. योगाच्या आठही अंगांचे श्रद्धेने पालन केल्यास मानवाचा इहलोक व परलोक साधला जातो, असे विचार योग व आयुर्वेदाचे अभ्यासक स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.  ‌                    येथील आर्य समाजातर्फे संचालित नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल  आश्रमात  योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुकुलाचे प्रमुख आचार्य श्री सत्येंद्रजी विद्योपासक यांनी सर्व ब्रह्मचारी  विद्यार्थी, वानप्रस्थी, संन्यासी व कर्मचाऱ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की नियमित योगासने केल्याने शारीरिक रोग व विकार नाहीसे मानवाला उत्तम स्वास्थ्य लाभते.  स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी प्राणायामाचे विशुद्ध स्वरूप सांगून त्यांच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण दिले.  यावेळी ते म्हणाले की

शरीर, मन व बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक-"वैद्यनाथ" मधील योगदिन कार्यक्रमात डॉ. आचार्य यांचे प्रतिपादन

इमेज
शरीर, मन व बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक-"वैद्यनाथ" मधील योगदिन कार्यक्रमात डॉ. आचार्य यांचे प्रतिपादन     परळी वैजनाथ दि.२१--                          सध्याच्या धावपळीच्या युगात मानवी जीवन दिवसेंदिवस हताश, निराश व दुःखी होत चालले असून शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी आणि सर्वांगीण शाश्वत सुखासाठी अष्टांग योगाचे अनुष्ठान करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन योगशिक्षक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले.                            येथील वैद्यनाथ महाविद्यालयात  महाविद्यालय एन.सी.सी., एन. एस. एस., क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख योगप्रशिक्षक म्हणून डॉ.श्री आचार्य यांनी योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी त्यांनी विविध आसने व प्राणायाम शिकवून दैनंदिन जीवनात व मानसिक विकासासाठी योग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.स. ६.३० ते ७.३० यावेळेत संपन्न झालेल्या या  योगदिन समारंभात सर्वप्रथम विभागाचे प्रमुख, कॅप्टन प्रा. श्री जी. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन  स्थूल व्यायामांचे प्रशिक्षण दिले. या

आगामी निवडणुकांत भाजपाला यश मिळवायचे असेल तर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घ्या - अश्विन मोगरकर

इमेज
आगामी निवडणुकांत भाजपाला यश मिळवायचे असेल तर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घ्या - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर घेऊन महाराष्ट्रातील जनमानसातील नेतृत्वास न्याय द्यावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.            विधानपरिषदेच्या महाराष्ट्रातील 11 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेऊन महाराष्ट्रातील जनमानसातील रणझुंझार नेतृत्वाचा भारतीय जनता पक्षाने सन्मान करावा.राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश मिळू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आहे. या मुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात दुःखाची लाट पसरली असून अनेक अप्रिय घटना यामुळे घडल्या आहेत.हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय जनता पक्षाने मागील पाच वर्षात अनेक वेळा संधी नाकारल्याने अगोदरपासूनच आम्हा कार्यकर्त्यांत नाराजी

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभाचे रननीतिकार

इमेज
  मैदानात उतरण्याआधी 20 दिवसात जोरदार नेट प्रॅक्टिस केलेला बॅट्समन : विलास संदीपान भुमरे  मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती    संभाजीनगर लोकसभाचे रननीतिकार  आ त्ताच लोकसभा निवडूनक बऱ्याच जणांच अस म्हणणं आलं की ही निवडणूक विलास बापूच्या राजकीय अस्मिताची  होती खरंतर या बापूं साहेबच्या दोन निवडणुकीत एकहाती धुरा सांभाळत आधीच स्वतःला सिद्ध केलंय आणि जरी या लोकसभा निवडणुकीला आपण पूर्वपरीक्षा मानलं तरी एखाद्या अभ्यासू पोरासारखं हे पोरगं  पूर्ण अभ्यास करून , सगळ्या संभाव्य प्रश्नांची तयारी करून , पुस्तक बऱ्याचदा उलटीपालटी करून परीक्षेला बसलं आणि पहिल सुद्धा आलं. पूर्वपरीक्षा आहे म्हणून ना हलक्यात घेतलं ना समोरच्यांना घेऊ दिलं. बापू तुम्ही आज सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं की तुम्ही फक्त पैठणचेच किंवा छत्रपती संभाजीनगरचेच नव्हे तर मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे सुद्धा नेतृत्व करू शकतात आणि हे तुम्ही या निवडणुकीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात तुम्ही नक्कीच मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व कराल असा आम्हा पैठणकरांना विश्वास आहे .             मैदानात उतरण्याआधी द

मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी उपोषणाला भेट द्यावी ; भेट देणंही तेवढचं महत्वाचं

इमेज
  लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाविषयी सरकारने  भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी - पंकजा मुंडे यांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी उपोषणाला भेट द्यावी ; भेट देणंही तेवढचं महत्वाचं मुंबई ।दिनांक १९। ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलना विषयी राज्य सरकारने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. हाके यांच्या उपोषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भेट देऊन त्यांचं म्हणण ऐकून घ्यावं, ही भेटही तेवढीच महत्वाची आहे, असं त्यांनी या तिघांनाही पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.    पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे की, ओबीसी आरक्षणा संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री जि. जालना येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही, त्यांनी पाणी देखील बंद केले आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे. श्री हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्य

महिला महाविद्यालयात त्रिदिवसीय योग कार्यशाळा

इमेज
महिला महाविद्यालयात त्रिदिवसीय योग कार्यशाळा; प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते झालं उद्घाटन  परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)             नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत अग्रेसर असलेल्या येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून ' *स्त्री सशक्तीकरणासाठी योग* ' या संकल्पनेला अनुसरून त्रिदिवसीय महिला योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्कृत विभाग , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षा व उद्घाटक म्हणून म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे या उपस्थित होत्या , डॉ . खेडकर के पी . आणि डॉ विलास देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्कृत विभाग प्रमुख डॉ.अरुण चव्हाण उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ . दिग्रसकर यांनी केले. त्यांत त्यांना योगाची जीवनातील आवश्यकता सांगून योग परंपरेचा आढावा घेतला . उद्घाटनानंतर कार्यशाळेचे प्रथम पुष्प

काॅलेजला ॲडमिशन करायला म्हणून गेलेली युवती बेपत्ता

इमेज
काॅलेजला ॲडमिशन करायला म्हणून गेलेली युवती बेपत्ता  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       कॉलेजला जाऊन ऍडमिशन करून येते असे सांगून घरातून निघून गेलेली परळी येथील १९ वर्षिय युवती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या पालकांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार संभाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने जुन्या गाव भागात एकच खळबळ उडाली आहे.       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळीतील मल्हारनगर, उखळवेस भागातील एक १९ वर्षिय युवती दि.18/06/2024 रोजी दुपारी 09.00 वा.चे सुमारास कॉलेजला अ‍ॅडमिशन घेवुन येते असे म्हणुन घरातुन निघुन गेली. ती परत आलीच नाही. म्हणुन तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.पोअं.दुर्गे यांचेकडे पुढील तपास देण्यात आला आहे.