शरीर, मन व बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक-"वैद्यनाथ" मधील योगदिन कार्यक्रमात डॉ. आचार्य यांचे प्रतिपादन

शरीर, मन व बुद्धीच्या विकासासाठी योग आवश्यक-"वैद्यनाथ" मधील योगदिन कार्यक्रमात डॉ. आचार्य यांचे प्रतिपादन    



परळी वैजनाथ दि.२१--                

         सध्याच्या धावपळीच्या युगात मानवी जीवन दिवसेंदिवस हताश, निराश व दुःखी होत चालले असून शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी आणि सर्वांगीण शाश्वत सुखासाठी अष्टांग योगाचे अनुष्ठान करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन योगशिक्षक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले.                            येथील वैद्यनाथ महाविद्यालयात  महाविद्यालय एन.सी.सी., एन. एस. एस., क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख योगप्रशिक्षक म्हणून डॉ.श्री आचार्य यांनी योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी त्यांनी विविध आसने व प्राणायाम शिकवून दैनंदिन जीवनात व मानसिक विकासासाठी योग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.स. ६.३० ते ७.३० यावेळेत संपन्न झालेल्या या  योगदिन समारंभात सर्वप्रथम विभागाचे प्रमुख, कॅप्टन प्रा. श्री जी. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन  स्थूल व्यायामांचे प्रशिक्षण दिले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक ,पालक आणि नागरिक उपस्थित होते. 

        सध्याच्या युगात योगाचे महत्त्व ओळखून युवक व विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा प्रसार व्हावा, यासाठी शाळा/ महाविद्यालयात योगदिन साजरा करण्याबाबत मा. कर्नल सुनील रेड्डी, कमांडिंग ऑफिसर 51, महाराष्ट्र बटालियन, संभाजीनगर, यांनी काढले होते. त्यांच्या आदेशानुसार  एनसीसी विभागाने योग प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमानंतर  प्र.प्राचार्य डॉ.आर.डी.राठोड, उपप्राचार्य सर्वश्री प्रा.डॉ.व्ही.बी. गायकवाड , प्राध्यापक हरीश मुंडे,विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. पी.एल. कराड, प्रा. डॉ. जे.व्ही. जगतकर, आमच्यासह  प्राध्यापकगण ,शिक्षकगण, पालक , इतर कर्मचारी ,छात्र सेनेचे विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख कॅप्टन जी.एस.चव्हाण  आणि जि.प.शाळेचे एनसीसी सहशिक्षक श्री.शाकेर सर यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात व शेवट प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना पौष्टिक फराळ वाटप करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार