काॅलेजला ॲडमिशन करायला म्हणून गेलेली युवती बेपत्ता

काॅलेजला ॲडमिशन करायला म्हणून गेलेली युवती बेपत्ता 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      कॉलेजला जाऊन ऍडमिशन करून येते असे सांगून घरातून निघून गेलेली परळी येथील १९ वर्षिय युवती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या पालकांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार संभाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने जुन्या गाव भागात एकच खळबळ उडाली आहे.

      याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळीतील मल्हारनगर, उखळवेस भागातील एक १९ वर्षिय युवती दि.18/06/2024 रोजी दुपारी 09.00 वा.चे सुमारास कॉलेजला अ‍ॅडमिशन घेवुन येते असे म्हणुन घरातुन निघुन गेली. ती परत आलीच नाही. म्हणुन तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.पोअं.दुर्गे यांचेकडे पुढील तपास देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!