इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

परळीतील प्रख्यात प्रखर हिंदुत्ववादी डॉ. प्रकाश डुबे यांचे निधन

 परळीतील प्रख्यात प्रखर हिंदुत्ववादी डॉ. प्रकाश डुबे यांचे निधन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
              परळी शहर व परिसरातील सर्व परिचित असलेले जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉक्टर त्याचबरोबर प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले डॉ. प्रकाश डुबे यांचे आज (दि.२२ )सकाळी पावणेदहा वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
            डॉ. प्रकाश रामचंद्रराव डुबे हे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व होते. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे डॉक्टर म्हणून त्यांचा सर्वांनाच परिचय आहे. हिंदू धर्म संस्कृती, धर्माचरण, योग व वैदिक सनातन हिंदू धर्म तत्त्वाचे प्रखर पुरस्कर्ते म्हणून त्यांनी आपली वाटचाल केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही ते सक्रिय होते. आपली वैद्यकीय सेवा बजावतानाच प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करून त्यांनी धर्म व संस्कृती रक्षणाचे अनमोल कार्य केलेले आहे. डॉ. प्रकाश डुबे यांना आज सकाळी ९.४५  वा.सुमारास राहत्या घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 74 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परळीतील एक प्रखर हिंदुत्ववादी व संस्कृती रक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने डुबे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या