वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे
वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे
सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.
यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे असून मानवाच्या शाश्वत विकासासाठी त्यांचे संर्वधन- जतन करणे आपले मूळ कर्तव्य आहे . आपण आज बीज रोपण, वृक्ष रोपण कसे करतो, रडत रडत अश्रू गाळत पेरतो पंरतु वृक्ष , बीजाचे पेरणी आपणास फळ, धान्य, सावलीच देते हा त्यांचा धम्मच आहे . वृक्ष आपणास प्राणवायु देतात . धम्म आचरण हे आपला प्राणवायुच आहे हे आपण लक्षा ठेवणे गरजेचे आहे .
यावेळी पॅंथर रामदादा किरवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त फेटा पुष्पहार आयु सुभाष चोपडे, विलास किरवले, दयानंद झिंजुर्डे, संभाजी आरसुळे, रंजीत रोडे यांच्या हस्ते घालून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धम्मदान किरवले यांनी तर या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिरसाळा, यशोधरा महिला मंडळ शिरसाळा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व भीम सैनिकांनी परिश्रम घेतले.
या याप्रसंगी मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा