युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

आगामी निवडणुकांत भाजपाला यश मिळवायचे असेल तर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घ्या - अश्विन मोगरकर

आगामी निवडणुकांत भाजपाला यश मिळवायचे असेल तर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घ्या - अश्विन मोगरकर


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर घेऊन महाराष्ट्रातील जनमानसातील नेतृत्वास न्याय द्यावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

           विधानपरिषदेच्या महाराष्ट्रातील 11 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेऊन महाराष्ट्रातील जनमानसातील रणझुंझार नेतृत्वाचा भारतीय जनता पक्षाने सन्मान करावा.राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश मिळू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आहे. या मुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात दुःखाची लाट पसरली असून अनेक अप्रिय घटना यामुळे घडल्या आहेत.हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय जनता पक्षाने मागील पाच वर्षात अनेक वेळा संधी नाकारल्याने अगोदरपासूनच आम्हा कार्यकर्त्यांत नाराजी आहे. 

महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद जागेवर पंकजा मुंडे यांची आमदार म्हणून नियुक्ती झाल्यास महाराष्ट्रातील आमच्यासारख्या भाजप कार्यकर्त्यांत पक्षाबद्दल चांगला संदेश जाऊन आगामी निवडणुकीत पक्षाला याचा निश्चितच फायदा होईल. पक्षाने तात्काळ निर्णय घेऊन पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या