पंकजा मुंडेंविषयी इन्स्टाग्रामवर पुन्हा अत्यंत अश्लील प्रतिक्रिया:परळीत एकाविरुद्ध गुन्हा दाखल
पंकजा मुंडेंविषयी इन्स्टाग्रामवर पुन्हा अत्यंत अश्लील प्रतिक्रिया:परळीत एकाविरुद्ध गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा...
भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर अत्यंत अश्लील प्रतिक्रिया व्यक्त करुन जाणीवपूर्वक भावना दुखवणे व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल माध्यमावर व्यक्त होणाऱ्या एकाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि. 23/06/ 2024 रोजी रात्री 08.00 वा.आरोपी इन्स्टाग्राम आयडीधारक अभी तळेकर (abhi_talekar_1010) याने इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडे यांचे विषयी अत्यंत अश्लील शब्दांत एक प्रतिक्रिया (comment) टाकली. यामुळे भावना दुखावल्या जाणार आहेत तसेच दोन जातीमध्ये किंवा दोन गटात द्वेषाची भावना निर्माण हाईल याची कल्पना असताना देखील जाणीवपुर्वक इंस्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकली. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातील कर्मचारी पवन केशव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुरनं. 93/2024 कलम 153 (अ), 505 (2) भादवी सह कलम 67 IT Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनी ससाणे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा