परळी आगाराकडून विद्यार्थ्यांनीना शाळेतच प्रवास पास वाटप
विद्यार्थ्यांचा प्रवास एसटीच्या मदतीने होणार सुखकर
●परळी आगाराकडून विद्यार्थ्यांनीना शाळेतच प्रवास पास वाटप
परळी / प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या विविध सवलतीच्या योजना पासून शाळा आणि शालेय विद्यार्थी दूरच राहिले आहेत त्यामुळे यावर्षी बीड विभागातील परळी वैजनाथ एसटी आगाराकडून विद्यार्थी प्रवास पास सवलतीसह अनेक सवलतींच्या योजनांची माहिती प्रत्येक शाळेत पोहोचवली जात आहे परिणामी विविध प्रवासांच्या योजना विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षकांना समजण्यास मदत मिळत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास आता सुखकर होण्यास मदत होणार आहे.
जूनच्या मध्यावर शाळा सुरू होतात ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मासिक प्रवास पास करिता मोठी गर्दी होत असते. पाचवी ते बारावीपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही योजना विद्यार्थिनी साठी मोफत पास योजना असल्याने या योजनेस प्रतिसाद चांगला मिळतो. या योजनेशिवाय विद्यार्थी आणि शाळा पर्यंत एसटी महामंडळाच्या इतर प्रवासाच्या सवलतीची माहिती पोहोचली जात नव्हती परिणामी विद्यार्थी वर्ग याबाबत अनभिज्ञ राहत होता मात्र याबाबत परळी वैजनाथ एसटी आगाराच्या वतीने शाळा महाविद्यालयात विविध पास व सवलतीचा जागर केला जात आहे.
परळी एसटी आगर प्रमुख संतोष नागनाथआप्पा महाजन यांच्यासह आगारातील कर्मचारी हे शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शालेय पास व सवलतीच्या लाभाविषयी माहिती देत आहेत तसेच नियमित विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवास पास योजनेतून विद्यार्थिनींना मोफत पास शाळेतच मुलांच्या हाती देण्याची सोय उपलब्ध केली आहे. शहरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात ज्या गावात मासिक पास सवलत धारक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून एसटी फेऱ्या कमी आहेत.विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून केला जात आहे तर आवश्यकतेनुसार काही मार्गावर फेऱ्या उपलब्ध केल्या जात आहेत.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर साहेब व बीड विभागाचे विभाग नियंत्रक श्री अजय कुमार मोरे साहेब यांचे आदेशानुसार दि 22 जून 2024 रोजी परळी आगाराचे आगार व्यवस्थापक संतोष महाजन, वाहतूक निरीक्षक बळीराम दराडे, संतोष चव्हाण ,वरिष्ठ लिपिक विजय सोनवणे यांनी परळी तालुक्यातील पापनाथेश्वर विद्यालय नाथरा,आसुबाई विद्यालय मांडखेल,महाराष्ट्र विद्यालय मोहा या शाळेंना प्रत्यक्ष भेट देऊन महामंडळातील विविध सवलती बाबतची माहिती मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्गांना देऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत 280 पासेसचे वितरण केले आहे या प्रसंगी परळी आगाराचे वतीने प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थिनींना वही व पेन भेट दिली आहे.या भेटी दरम्यान पापनाथेश्वर विद्यालय नाथरा येथे मुख्याध्यापिका कराड मॅडम,आसूबाई विद्यालय मांडेखेल येथील मुख्याध्यापक सुरेश बुरांडे तर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी शाळा असलेल्या महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे संस्थेचे सचिव कॉ.एड.अजय बुरांडे सर यांच्यासह मुख्याध्यापक विनायक राजमाने, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा