युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

 श्री क्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी वन विभागाकडून 4 हेक्टर जमीन गडाला हस्तांतरित करण्यास केंद्रीय वन विभागाची मान्यता

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा


रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, यात्री निवास, वाहनतळ इत्यादी कामे केले जाणार


केंद्रीय वन विभागाचे व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मुंडेंनी मानले आभार


मुंबई (दि. 24) - श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे. 


भगवान गडाचे महंत न्यायाचार्य,  ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सदर जमीन वन विभागाकडून हस्तांतरित करून भगवानगडाच्या विकास कार्यासाठी देण्यात यावी, याबाबत धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्य शासनास व केंद्र शासनास विनंती केली होती. 


भगवानगडाच्या परिसरातील या जमिनीवर रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, यात्री निवास, वाहन तळ इत्यादी कामे आगामी काळात करणे प्रस्तावित आहे. 


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांच्या मागणीला यश आले आहे. धनंजय मुंडे यांनी भगवानगड भक्त परिवाराच्या वतीने केंद्रीय वन विभागाचे व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या