original papu playing pictures
original papu playing pictures:चित्रांचा 'सोरट' जुगार खेळवणारा व खेळणारांवर पोलीसांची कारवाई
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
विविध चित्रांच्या रकान्यात पैसे लावायचे अन् बंद चिठ्ठीत निघणाऱ्या चित्रांवरुन जुगाराच्या नियमानुसार पैसे द्यायचे किंवा डुलवायचे अशा प्रकारचा चित्रांचा 'सोरट' जुगार खेळवणारा व खेळणारांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,परळी वै.रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्तरेला पत्र्याच्या मोकळ्या तंबूखाली दि. 24 जुन रोजी दुपारी 2.50 वा. सुमारास काही लोक हे विनापरवाना बेकायदेशीरित्या सोरट नावाचा जुगार खेळत होते.चित्रावर पैसे लावुन लोकांकडून पैसे घेवुन स्वतःच्या फायद्यासाठी खेळत व खेळवित असताना पोलीसांना मिळुन आले.
याठिकाणी अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अंबाजोगाई यांच्या पथकाने कारवाई केली.या कारवाईत इंग्रजी मध्ये original papu playing pictures असे नाव असलेला एक गुलाबी रंगाचा पेपरचा चार्ट मिळाला. पोत्याखाली छत्री, हॉलीबॉल, सुर्य, दिवा, गाय, बकेट, पतंग, भवरा, गुलाबाचे फुल, फुलपाखरू, चिमनी, ससा असे चित्र असलेले व त्याखाली गुलाबी व निळ्या रंगाच्या चिठ्या चिकटवलेल्या व काही फाडण्यात आलेल्या चिठ्या, चार्ट, नगदी रोख रक्कम 4320 रू मिळाले.एक ओपो कंपनीचा जुना वापरता मोबाईल हँन्डसेट अंदाजे किंमत 12000 रू , एक जुना वापरता रिअलमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट अंदाजे किंमत 15000 रू, आणखी एक जुना वापरता रिअलमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट अंदाजे किंमत15000 रू. असे एकुण 46320/- किंमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
याप्रकरणात 1) अंकुश मुंजाजी सपाटे वय 40 वर्षे रा. शिवाजीनगर परळी वै (सोरट जुगार खेळविणारा) 2) नारायन विश्वनाथ आवाड वय 45 वर्षे रा. जलालपुर परळी वै 3) राघोजी राजाराम मुळे वय 45 वर्षे रा. टोकवाडी ता. परळी 4) कुलदीप फुलकुमार वाल्मीके वय 38 वर्षे रा. शिवाजीनगर परळी 5) शेख अन्सार शेख लाल वय 50 वर्षे रा. लोनी ता. परळी वै. 6) राजु भारत शिंदे वय 30 वर्षे रा. लोनी ता. परळी वै. 7) राम सोपानराव सोंदेवाड वय 67 वर्षे रा. स्टेशनवडगाव ता. गंगाखेड जि. परभणी 8) पिंटु त्रिंबक वाघमारे रा. हमालवाडी या सर्वांविरुद्ध अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अंबाजोगाई येथील कार्यरत पोह अनिल मधुकर दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. येथे गुरनं- 104/2024 कलम 12 अ मजुका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सफौ होळंबे यांच्याकडे देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा