इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'

 फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'


    लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभवही भाजपाला मोठा धक्का देणारा ठरला. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. पंकजा मुंडे यांना आणि ओबीसी समाजाला प्रातिनिधीत्व देणं गरजेचं असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

      लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेवर पाठवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या समर्थकांकडून पक्षश्रेष्ठींना विनंती केली जात आहे. दरम्यान राज्यसभा किंवा आता ज्या कोणत्या जागा रिक्त होतील, तेव्हा पंकजा मुंडेंची वर्णी लावावी, अशी विनंती फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती मिळत आहे. 


पंकजा मुंडे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून देवेंद्र फडणवीस यांनी तशी केंद्राकडे विनंती केल्याची माहिती मिळत आहे असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी 'मलाही अशी माहिती मिळत आहे' असं हसत उत्तर दिलं आणि निघून गेल्या. 


भाजपाच्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे ही मागणी जोर धरत आहे. आमदार सुरेश धस काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी लावून धरली होती. पंकजा मुंडे या ओबीसीच्या नेत्या आहेत. त्या पराभूत जरी झाल्या तरी त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले पाहिजे, असा सूर बीडमधून येतोय. एवढंच नाही तर नगरमध्ये पोस्टरही लागले आहेत.  भाजपच्या एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

भाजपाच्या तीन जागा रिक्त?

भाजपाच्या राज्यात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. पियूष गोयल, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील तिन्ही सदस्य लोकसभेत गेल्याने रिक्त आहेत. या जागांवर भाजप कुणाला पाठवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातील नेत्यांची या जागांवर वर्णी लागणार की इतर राज्यातील नेत्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या