भावपुर्ण श्रद्धांजली.......
अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य विधीचार्य लक्ष्मीकांत दीक्षित कालवश, देशभरातील भक्तांवर शोककळा
अयोध्येतील राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य विधीचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आचार्य मागील काही दिवसांपासून आजारी होते.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात १२१ पुरोहीतांनी सहभाग नोंदवला. या पुरोहितांचे नेतृत्व लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं होतं. आज सकाळी ६.४५ वाजता दीक्षित यांचं निधन झालं. त्यांचा मृतदेह सध्या घरी असून मणिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधानाने काशीसहित देशभरातील भक्तांवर शोककळा पसरली आहे. पं.आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांचं निवासस्थान मंगलागौरीहून निघणार आहे.आचार्य लक्ष्मीकांत यांचा सामावेश काशीतील मोठ्या पंडितामध्ये होतो. त्यांची भारतीय सनानत संस्कृती आणि परंपरेवर प्रचंड उच्चकोटीची आस्था होती. लक्ष्मीकांत हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद कॉलेजचे वरिष्ठ आचार्य होते. या कॉलेजची स्थापना काशी नरेश यांच्या मदतीने झाली.
लक्ष्मीकांत दीक्षित महाराष्ट्रातील सोलापूरमधील जेऊरचे मुळ रहिवाशी होते. दीक्षित यांच्या पुर्वपीढीतील लोक काशीत वास्तव्यास आले होते. लक्ष्मीकांत यांनी वेद आणि अनुष्ठानची दीक्षा ही काका गणेश दीक्षित यांच्याकडून घेतली होती.
जानेवारी महिन्यात अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील मुख्य विधीचार्याची भूमिका निभावणारे काशी विश्वनाथ कॉरिडोरचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं होतं.
आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाची माहिती मिळताच सनातनी परंपरा मानणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या पुरोहितांनी आचार्य दीक्षित यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा