महिला महाविद्यालयात त्रिदिवसीय योग कार्यशाळा

महिला महाविद्यालयात त्रिदिवसीय योग कार्यशाळा; प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते झालं उद्घाटन 


परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)


            नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत अग्रेसर असलेल्या येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून ' *स्त्री सशक्तीकरणासाठी योग* ' या संकल्पनेला अनुसरून त्रिदिवसीय महिला योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्कृत विभाग , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षा व उद्घाटक म्हणून म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे या उपस्थित होत्या , डॉ . खेडकर के पी . आणि डॉ विलास देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्कृत विभाग प्रमुख डॉ.अरुण चव्हाण उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ . दिग्रसकर यांनी केले. त्यांत त्यांना योगाची जीवनातील आवश्यकता सांगून योग परंपरेचा आढावा घेतला . उद्घाटनानंतर कार्यशाळेचे प्रथम पुष्प गुंफताना प्रा.डॉ. अरुण चव्हाण यांनी योग शब्दाची व्युत्पत्तिसिद्ध व्याख्या सांगून आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी योग कसा महत्वाचा आहे याबद्दलही त्यांनी यथार्थ विवेचन केले . विद्यार्थिनींची आहारचर्या, दिनचर्या याबद्दलही मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्या डॉ . विद्या देशपांडे यांनी योगाचे स्त्रीजीवनातील महत्व सोदाहरण विशद केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . दिग्रसकर यांनी केले तर रासेयोच्या डॉ . कल्याणकर आर बी . यांनी आभार मानले . या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !