युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मुला मुलींना घेतले दत्तक

 मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या देठे कुटुंबीयांना मंत्री तानाजी सावंत यांनी दिला आधार 

मराठा समाजाच्या सुख दुःखात कायम पाठीशी राहणार- मंत्री प्रा. तानाजी सावंत

पुणे,(प्रतिनिधी):- मराठा आरक्षणासाठी नुकतीच आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना राज्याचे कुटुंब व कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी सांत्वन पर भेट देऊन त्या कुटुंब यांना आधार देत 5 लाख रुपये सुपूर्द केले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या सुखदुःखात आपण कायम पाठीशी राहणार असल्याचे कुटुंब बालकल्याण मंत्री मराठा भूषण प्राध्यापक तानाजी सावंत यांनी सांगितले.


 वाघोली, पुणे येथे मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कै.प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजी सावंत यांनी भेट घेत सांत्वन केले. त्या कुटुंबाला पाहता क्षणी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांना अश्रू अनावर झाले. समाजाप्रती असलेला कळवळा व समाजाला मदत करण्याची दानत त्यांनाच असते. ज्यांना आपल्या मातीला व समाजाला बसलेल्या चटक्याची जाण असते. याचीच प्रचिती येत आहे. मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आजपर्यंत शेकडो गरजू व मराठा समाजासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना मदतीचा हात दिला आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणासाठी आपले जीवन संपवु नये. असे आवाहनही मराठा समाजाच्या युवकांना मंत्री प्रा सावंत त्यांनी केले आहे. यावेळी मराठा समाजातील असंख्य बांधव उपस्थित होते.


मुला मुलींना घेतले दत्तक

मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिलेल्या प्रसाद देठे यांना तात्काळ पाच लाख रुपयाची मदत करत त्यांच्या कुटुंबातील देठे यांचा मुलगा आणि दोन मुली अश्या तिन्ही मुलांना दत्तक घेत  मुलांच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची सर्व जवाबदारी आपण घेत असल्याचे यावेळी मंत्री प्रा. तानाजी सावंत सांगितले.आज तागायात मराठा समाजाच्या जवळ पास 90 ते 100 कुटुंबांना आर्थिक मदत करून मुलांना दत्तक घेऊन त्यांच पालकत्व प्रा.सावंत पार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या