ऑनलाईन 'बिंगो' जुगार खेळवणारांवर व खेळणारांवर धाड टाकून कारवाई
ऑनलाईन 'बिंगो' जुगार खेळवणारांवर व खेळणारांवर धाड टाकून कारवाई
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अंबाजोगाई येथील पथकाने परळी शहरातील विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून कारवाई केली. यामध्ये बसस्थानक परिसरात चालविल्या जाणाऱ्या ऑनलाईन 'बिंगो' जुगार केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,परळी वै. बसस्थानकासमोरील एका चहाच्या हॉटेलच्या बाजुस असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये दि.24 रोजी दुपारी 4.30 वा. काही लोक संगणकावरील आकड्यावर पैसे लावुन विनापरवाना बेकायदेशीररित्या ऑनलाईन बिंगो नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना मिळून आले.
याप्रकरणी 1) मुंजा ऊर्फ मुन्ना पांडुरंग तौर वय 24 वर्षे रा. वडसावित्री गल्ली परळी वै, जुगार खेळणारे इसम नामे 2) मोसीन हाबीब शेख वय 33 वर्षे रा. हबीबपुरा परळी वै, 3) आसीफ दस्तगीर शेख वय 22 वर्षे रा. हबीबपुरा परळी वै 4) सय्यद वसीम सय्यद नबी वय 32 वर्षे रा. मलीकपुरा परळी वै, 5) राधाकीशन मारोती देवकते वय 55 वर्षे रा. लोणी ता. परळी वै. हे स्वतःचे तसेच बिंगो जुगार मालक नामे 6) रामेश्वर किसनराव आचार्य वय 35 वर्षे रा. सुभाषचौक परळी वै. याचे फायदया साठी संगणकावरील आकड्यावर पैसे लावुन विनापरवाना बेकायदेशीररित्या ऑनलाईन बिंगो नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना आढळून आले म्हणुन त्यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 12 (अ) मु.जु.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईत जुगाराचे साहीत्य (संगणक), मोबाईल व नगदी रुपये असे एकुण 40,420/- रु. मुद्देमाल मिळुन आला आहे. अधिक तपास परळी शहर पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा