लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात
परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)
येथील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, संचालिका छाया पत्की, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम ज्योती जुनाळ, द्वितीय मधुरा पोखरकर, तृतीय मयुरी गोरे तर कला शाखेतून प्रथम ऋतुजा कुंभार, द्वितीय प्रिती कुंभार, तृतीय विद्या गंगाधरे यांचा व पालकांचा शाल, पुष्पगुच्छ, मेडल देवून सत्कार करण्यात आला.
तसेच महाविद्यालयातील विविध विषयात पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावल्या बदल गिफ्ट देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा डॉ विनोद जगतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोप संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी केला. १२ वीच्या गुणवंत विद्यार्थिनी गुट्टेनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा प्रविण नव्हाडे, आभार प्रा प्रविण फुटके यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक,शिक्षक, पालक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा