अभिनव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सहज योग कार्यक्रम

 अभिनव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सहज योग  कार्यक्रम



परळी . प्रतिनिधी .ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहज योग कार्यक्रमांतर्गत साजरा करण्यात आला .या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव पवार व्यासपीठावर उपस्थित होते तसेच सहज योग  याचेयोग साधक वैजनाथ शिरसाट सखाराम किटाळे राजाराम देशमुख सुजित कुंभार व शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मुंढे हे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती ची पूजन उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आजच्या योग दिवसाच्या प्रस्ताविक शाळेतील सहशिक्षक सिताराम गुट्टे यांनी मांडले

सहज योग या अंतर्गत वैजनाथ शिरसाट व सखाराम किटाळे सर यांनी योगासनाचे जीवनातील महत्त्व ,ध्यानधारणेचे महत्त्व व शरीराचा विकास होण्यासाठी योगासनाचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले

विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शरीराचा विकास तसेच मनाचा विकास बौद्धिक ,भावनिक आणि वैचारिक विकास होण्यासाठी योगासनाचे महत्त्व सांगितले तसेच श्वसन क्रियेद्वारे अंतरक्रियांचा विकास होण्यासाठी स्वच्छ श्वासाद्वारे क्रिया कशा कराव्यात हे ही प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने प्रमुख अतिथींचे आभार व्यक्त करण्यात आले .या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !