श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 1 जुलै रोजी परळी शहरात आगमन

 श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे 1 जुलै रोजी परळी शहरात आगमन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे सोमवार दि.01 जुलै 2024 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे.

शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असुन येत्या 1 जुलै  सोमवारी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहरातील अग्रवाल लॉज, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक मार्गे जगमित्र नाना मंदिर ह्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. सोमवार सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची  देणगी हासानंद बेगराज सामत कापड दुकान व अतुल क्लॉथ येथे स्विकारली जाईल. सर्व कापड व्यापारी व विविध व्यापारी यांच्याकडुन पालखीची सेवा व व्यवस्था केली जाते अशी माहिती विजय हासानंद सामत (मो.9850771177), विक्रम देशमुख, श्रीकांत गुंडाळे, रंजित भोयटे,  रामकिशन देवशटवार यांनी दिली.

श्री गजानन महाराज यांची पालखी दि.1 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासुन परळीतील जगमित्र नागा मंदिर येथे थांबणार असुन दि.2 जुलै 2024 रोजी अंबेजोगाई मार्गे पुढे श्री क्षेत्र पंढरपुरकडे पालखीचे प्रस्थान होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !