डॉ. संतोष मुंडे यांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद !

 डॉ. संतोष मुंडे यांनी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद !


राज्याचे कृषी मंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जागा वाढीसाठी प्रयत्न करणार : डॉ संतोष मुंडे

परळी : प्रतिनिधी....

      राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली असून,भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा पाहावयास मिळत आहे, परळी येथील साई स्पोर्ट्स अकॅडमी परळी येथे राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी भेट देऊन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विविध विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे डॉ मुंडे यावेळी म्हणाले.


गेल्या अनेक दिवसांपासून तरुण हे पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते, राज्य शासनाने भरतीची घोषणा केली परंतु जागेचा आणि भरतीतील उमेदवार यांची तफावत पाहता जागा अत्यंत कमी असल्याचे पाहावयास मिळत आहे. 


महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 रिक्त पदांकरिता संपूर्ण महाराष्ट्रात मैदानी चाचणी सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे एका पदासाठी 101 अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यामुळे जागा कमी आणि उमेदवार जास्त अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, 


दिनांक 21 जून रोजी परळी येथील साई स्पोर्ट्स अकॅडमी परळी येथे राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी भेट देऊन पोलीस भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेऊन, राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यामार्फत जागा वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले.

          जवळपास राज्यातील पोलीस भरतीमध्ये एका पदासाठी तब्बल 101 अर्ज आलेला असून पुरेशा जागा अभावी भरतीमध्ये, आणखीन जागा वाढवल्या पाहिजेत, असे मत महाराष्ट्र राज्य दिव्यंग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी व्यक्त केले.

                           -डॉ संतोष मुंडे

                   _______

अनेक दिवसांपासून तरुण हे पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु शासनामार्फत निघालेली भरती ही अपुरी असून, ना.धनंजयजी मुंडे, व डॉ संतोष मुंडे यांच्या मार्फत भरतीच्या वाढीसाठी आम्ही मागणी केली आहे.

- आर बी चव्हाण 

पोलीस भरती प्रशिक्षक

(साई स्पोर्ट्स करिअर अकॅडमी)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?