मनःशांतीसाठी योग महत्वाचा

आंतरराष्ट्रीय योग दिन: महाराष्ट्राची रणरागिणी बनली योगिनी !

पंकजाताई मुंडे यांचं युट्यूब लाईव्ह ; ३५ हजारांहून अधिक व्हुअर्सनी नोंदवला सहभाग

विविध प्रकारच्या योगांचे दिले धडे ; सामाजिक प्रबोधनही केलं


मुंबई  ।दिनांक २१। 

राजकारण, समाजकारणासह सोशल मिडियावरही सतत सक्रिय असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त युट्यूब लाईव्ह वरून कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या योगांचे धडे दिले. राज्यभरातील सुमारे ३५ हजारांहून अधिक व्हुअर्सनी या युट्यूब लाईव्ह मध्ये सहभाग घेतला होता.


   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  आज कुठल्याही जाहीर कार्यक्रमात सहभाग न घेता पंकजाताई मुंडे यांनी एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने योग दिन साजरा करण्याचे ठरवले. खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या जीवनात योगाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. देशाचा हा प्राचीन ठेवा आज संपूर्ण जगाने स्विकारलायं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यात सहभागी होत असल्यामुळे संपूर्ण जगात याचा अधिक वेगाने प्रसार झाला. योगामुळे शरीरा बरोबरच आतील अवयवांचा देखील व्यायाम होतो तसेच आत्म्याचे देखील शुध्दीकरण होते असं पंकजाताई म्हणाल्या. यावेळी त्यांनी कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी, अनुलोम विलोम, ओमकार असे विविध प्रकारचे योगा प्रात्यक्षिक करून दाखवले. पंकजाताईंच्या आजच्या या उपक्रमांचा राज्यभरातील हजारो लोकांनी उत्स्फूर्त लाभ घेत त्यांचं कमेंट्स करून खास अभिनंदन केलं. अनेकांनी आपल्याला यातून उर्जा मिळाल्याचही म्हटलं.


*मनःशांतीसाठी योग महत्वाचा*

------ 

योगा बरोबरच  पंकजाताई मुंडे यांनी यावेळी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले. आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतो. राजकारण, समाजकारण,  व्यवसाय करत असताना आपल्याला जीवनात अनेक चढ उतार, सुख दुःखाचे प्रसंग येत असतात. आज कलियुग आहे. कितीही संघर्ष आला तरी चांगले आचार विचार व संस्कारांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे चालायचे आहे. ध्यान, प्राणायाम,योगासने नियमित केल्याने आरोग्या सोबतच मनस्वास्थ्य लाभते असं त्या यावेळी म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार