युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी उपोषणाला भेट द्यावी ; भेट देणंही तेवढचं महत्वाचं

 लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाविषयी सरकारने  भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी - पंकजा मुंडे यांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी

मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी उपोषणाला भेट द्यावी ; भेट देणंही तेवढचं महत्वाचं


मुंबई ।दिनांक १९।

ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलना विषयी राज्य सरकारने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. हाके यांच्या उपोषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भेट देऊन त्यांचं म्हणण ऐकून घ्यावं, ही भेटही तेवढीच महत्वाची आहे, असं त्यांनी या तिघांनाही पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.


   पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे की, ओबीसी आरक्षणा संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री जि. जालना येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही, त्यांनी पाणी देखील बंद केले आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे. श्री हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यानी तसेच आपण स्वतः गांभिर्याने लक्ष तर द्यावेच याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे. "कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये" असंच आवाहन ते करत आहेत म्हणजे व्यवस्थेचा सन्मानच करत आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे प्रश्न समान न्यायाचा आहे, म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय  घ्यावा अशी आवश्यकता आहे. आपण व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलना विषयीची आपली भूमिका जाहीर स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी अशी आपणास माझी विनंती आहे.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या