जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभाचे रननीतिकार

 मैदानात उतरण्याआधी 20 दिवसात जोरदार नेट प्रॅक्टिस केलेला बॅट्समन : विलास संदीपान भुमरे 


मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती    संभाजीनगर लोकसभाचे रननीतिकार 


त्ताच लोकसभा निवडूनक बऱ्याच जणांच अस म्हणणं आलं की ही निवडणूक विलास बापूच्या राजकीय अस्मिताची  होती खरंतर या बापूं साहेबच्या दोन निवडणुकीत एकहाती धुरा सांभाळत आधीच स्वतःला सिद्ध केलंय आणि जरी या लोकसभा निवडणुकीला आपण पूर्वपरीक्षा मानलं तरी एखाद्या अभ्यासू पोरासारखं हे पोरगं  पूर्ण अभ्यास करून , सगळ्या संभाव्य प्रश्नांची तयारी करून , पुस्तक बऱ्याचदा उलटीपालटी करून परीक्षेला बसलं आणि पहिल सुद्धा आलं. पूर्वपरीक्षा आहे म्हणून ना हलक्यात घेतलं ना समोरच्यांना घेऊ दिलं. बापू तुम्ही आज सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं की तुम्ही फक्त पैठणचेच किंवा छत्रपती संभाजीनगरचेच नव्हे तर मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे सुद्धा नेतृत्व करू शकतात आणि हे तुम्ही या निवडणुकीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात तुम्ही नक्कीच मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व कराल असा आम्हा पैठणकरांना विश्वास आहे .           

 मैदानात उतरण्याआधी दमदार नेट प्रॅक्टिस केलेला बॅट्समन जसा आत्मविश्वासाने फटकेबाजी करत असतो त्याच्या प्रत्येक स्ट्रोक मध्ये त्याची मेहनत दिसत असते तसा आत्मविश्वास अन मेहनत बापू च्या प्रत्येक कृतीतून दिसते. जेंव्हापासून विलास बापू भुमरे हे नाव चर्चेत आलं त्यावेळीपासून अनेक छोट्या छोट्या गोष्टींच निरीक्षण करत आलो आहे आणि प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक केली जातेय याचा विचार करून मला विलास बापू भुमरे हा येत्या काळातला सर्वात मोठा मास लीडर वाटतो.


 गावात गेले तरी विलास बापू गावातल्या वृद्ध लोकांमध्ये रमताना दिसतात , कुणाच्याही  घरात बसून सहज गप्पा मारून सारवलेल्या भुईवर बसून जेवण करून येतात आणि याच गोष्टी तमाम तालुक्यातील जनतेला भावतात. एका बाजूला सामान्य लोकांशी हात मिळवला तरी बिसलेरी च्या पाण्याने हात धुणारे राजकारणी इथल्या लोकांनी पाहिलेत त्यामुळं आपल्या घराच्या अंगणातल्या बाजावर बसून गप्पा मारणारा बापू इथल्या लोकांना साहेब नंतर बापूइतकाच जवळचा वाटतो. 


 लोकसभा अगदी विरोधकांनीही विजयाच कौतुक करावं इतका नेत्रदीपक हा विजय होता.

 

कुठल्याही कामासाठी विलास बापूं ना फोन केला असता त्यावेळी तो फोन उचलणं शक्य झालं नाही तर ज्यावेळी कामाच्या व्यापातून बाहेर पडतील त्यावेळी स्वतःहून कॉलबॅक करून अडचण जाणून घेणं आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणं अश्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी या युवानेत्याला इतर नेत्यांहून सुस्पष्ट वेगळेपण देतात. 


आपण वडिलांसाठी काय करावे किती करावे आणि कसं कराव हे आपल्याकडून शिकायला मिळाले.अवघ्या 20 दिवसात आपण मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे निवडणुकीचे नियोजन केले. फक्त नियोजनच नाही तर अति सूक्ष्म नियोजन केले त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मी बघितलं की बापूचा दिवस सकाळी  6 ला चालू व्हायचा तर तो दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत असायचा. झोप फक्त 2 तास परत सकाळी 6 पासून नियोजनाला सुरुवात सकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत साहेबांसोबत चर्चा आणि त्यानंतर जेवण करून 7 वाजता प्रचार कार्यालयात येऊन सर्व कार्यकर्त्यांना दिवसभराचे नियोजन सांगून 8 वाजता प्रचार दौऱ्याला सुरुवात करायचे. गावोगावी जाऊन प्रत्यक्ष लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या त्यांच्या अडीअडचणी विचारायच्या त्यांच्याशी चर्चा करायची. दुपारी परत दोन-तीन वाजता प्रचार कार्यालयात यायचं शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आणि पुन्हा परत पाच वाजता शहरातील प्रचाराला सुरुवात करायची. गाडीत बसल्यानंतर आणि वेळ मिळेल तेव्हा या 20 दिवसात एक मिनिट ही वाया न जाऊ देता बापू रोज जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांशी फोनवर संवाद साधायचे म्हणजे या वीस दिवसात बापूने *एक ते सव्वा लाख लोकांशी थेट फोनवर संवाद साधला.* रात्री अकरा वाजता प्रचार संपला की मग तिथून पुढे बैठकीचं आणि दुसऱ्या दिवशीच नियोजन चालू व्हायचं ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत आम्हाला दिवसभराच्या कामाचा आढावा देण्यासाठीची वेळ असायची रात्रीच्या 2 किंवा 3 वाजताची पण तेव्हा सुध्दा #बापू अगदी हसतमुख असायचे चेहऱ्यावर कसलाच थकवा नाही,  ताणतणाव नाही कसलीच चिडचिड नाही. त्यांच्याकडे बघून आम्हांला सुद्धा ऊर्जा मिळायची. प्रत्येक दिवशी बापू आम्हाला सांगायचे खूप उशीर झालाय आराम करा नाहीतर आजारी पडताल बरं का? राजकारणात स्वतःपेक्षा कार्यकर्त्यांची काळजी घेणारे माणसं खूप कमी असतात आणि त्यातली एक म्हणजे आमचे नेते विलास बापू भुमरे होय.                                                                     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते नसतानाही विलास बापू भुमरे हा लंबे रेस का घोडा है ! अस म्हणताना अनेकांना ऐकलं आहे.  आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट नियोजनाने आणि अभ्यासपूर्वक करणाऱ्या विलास बापूं ना इथून पुढच्या लढाईसाठी आभाळभर शुभेच्छा ! 

आणि भुमरे साहेबचा हा वाघ लवकरच विधानभवनात डरकाळी फोडताना दिसावा या सदिच्छा .

बाकी नेटप्रॅक्टिस अशीच जोरदार सुरू राहूदे येणारा प्रत्येक सामना आपल्याला जिंकायचा आहे !

- ✍️उत्कर्ष उदयराव कुलकर्णी 

  8767531653

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?