पोस्ट्स

जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

MB NEWS----------- दुःखद वार्ता ----------- राजाभाऊ जोशी जयगावकर यांचे निधन

इमेज
 - ---------- दुःखद वार्ता -------- राजाभाऊ जोशी जयगावकर यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... . राजाभाऊ जोशी रा. जयगाव,वांगी ता. परळी वैजनाथ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना नातवंडे आहेत. श्री.सतीश व भगवान गुरु यांचे ते वडील होत.

MB NEWS-कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील खिल्लारे यांचे अकाली निधन

इमेज
  कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील खिल्लारे यांचे अकाली निधन परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी )            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील संगणकशास्त्राचे प्रा.डॉ.सुनील खिल्लारे (वय ३३) यांचे अल्प आजाराने मंगळवारी (ता.२७) सायंकाळी दुखःद निधन झाले. बुधवारी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.                 शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात संगणकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून प्रा.डॉ. सुनील खिल्लारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आजारी पडल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई,वडील, पत्नी, एक मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान बुधवारी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात श्रध्दांजली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ.

MB NEWS- *लसीकरण करतांना रेमडेसीवर सारखा अन्याय बीड जिल्हयावर होणार नाही याची खबरदारी घ्या - पंकजाताई मुंडे* *लसीकरण करणाऱ्या यंत्रणांना ट्विट करून दिल्या शुभेच्छा..!*

इमेज
 *लसीकरण करतांना रेमडेसीवर सारखा अन्याय बीड जिल्हयावर होणार नाही याची खबरदारी घ्या - पंकजाताई मुंडे*  *लसीकरण करणाऱ्या यंत्रणांना ट्विट करून दिल्या शुभेच्छा..!* मुंबई । दिनांक २८। लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे 'वेगळे' आणि पहिला डोस घेणाऱ्यांचे 'वेगवान' नियोजन करणे हे आव्हानात्मक काम आहे, असे सांगत लसीकरण करणाऱ्या सर्व यंत्रणांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तथापि, रेमडेसीवर इंजेक्शन सारखा अन्याय लसीकरणाच्या बाबतीत बीड जिल्हयावर होऊ नये याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. १८ ते ४४ वयाच्या नागरिकांना मोफत लस ही घोषणा महत्त्वाकांक्षी तरीही स्वागतार्ह आहे. सूक्ष्म नियोजन लस मिळवण्यासाठी आणि सुरळीत लसीकरण करण्यासाठी हे मोठे आव्हान आहे. जनतेचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याच्या आव्हानांना पेलण्यासाठी यंत्रणांना शुभेच्छा देत त्या म्हणाल्या, जेष्ठ नागरिक आणि लसीचा दुसरा डोस घेणार्‍या लोकांचे वेगळे नियोजन आणि १८ ते ४४ वयोगटांतील लोकांचे वेगवान नियोजन करावे लागेल. लसीकरण होताना विलंब अथवा दिरंगाई होता कामा नये. रेमडेसीवर स

MB NEWS------------------------------------------- *◼️Lockdown Extend | राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम* ------------------------------------------

इमेज
------------------------------------------  *◼️Lockdown Extend | राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम* ------------------------------------------  मुंबई : राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस हे लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे. राज्यात आता लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. 

MB NEWS-कोरोना लस घेण्याबाबत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी-

इमेज
  महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी-  गरोदर महिलांनी लस घ्यावी की नाही?  गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये.  स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी का?  स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये.  प्रसुती झाल्यानंतर लस घ्यावी का?  महिलेची प्रसुती झाल्यानंतरही लस घेऊ नये. सहा महिने थांबावे. नंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊनचं लस घ्यावी.  पीसीओडी, ओवरसीजचा त्रास असताना लस घ्यावी का?  पीसीओडी, ओवरसीजचा त्रास ही सामान्य बाब ठरली आहे. आपल्या पीसीओडी, ओवरसीज जरी असले तरी लस घेऊ शकतात. तसेच कुटूंब नियोजन करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरचं निर्णय घेऊ शकता. घाबरून जाऊ नका, मनात शंका आली की, डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्यावा, 

MB NEWS-बीडमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा* *पंकजाताई मुंडे यांनी अजित पवारांना पत्र पाठवून मांडले जिल्हयातील वास्तव !*

इमेज
 * बीडमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा*  *पंकजाताई मुंडे यांनी अजित पवारांना पत्र पाठवून मांडले जिल्हयातील वास्तव !* मुंबई । दिनांक २८। रेमडेसीवीर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत आहेत. हा सर्व प्रकार आपण स्वतः जातीने लक्ष घालून थांबवावा अशी मागणी करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयातील वास्तव उप मुख्यमंत्री अजित पवार यांचेसमोर पत्राद्वारे मांडले आहे.   रेमडेसीवीर इंजेक्शन वाटपाचा गैरवापर कोणीही करू नये. कोणत्याही माणसाने केला तरी तो चुकीचा आहे असे अजित पवार यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते. हाच मुद्दा घेऊन पंकजाताई यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आहेत. रेमडेसिवीरच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याकडे या समस्यांचे उत्तर नाही. अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या घेऊन रेमडेसिवीर देण्यात आले असे दाखवण्यात आलेले आहे पण ते रुग्णांन

MB NEWS-लसीकरण आणि कोविड रूग्णांच्या प्रभावी उपचाराची राज्यात अंमलबजावणी व्हावी* *पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केल्या दहा सूचना*

इमेज
 * लसीकरण आणि कोविड रूग्णांच्या प्रभावी उपचाराची राज्यात अंमलबजावणी व्हावी*  *पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केल्या दहा सूचना* मुंबई ।दिनांक २७। राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रूग्ण व निर्माण झालेली गंभीर परिस्थिती यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून कोविड लसीकरण मोहिम आणि रूग्णांच्या प्रभावी उपचार अंमलबजावणीसाठी दहा सूचना केल्या आहेत.   राज्यात १ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचा लसीकरण कार्यक्रमात वयाची अट नसावी कारण प्रत्येकाला स्वतःचे जीवन सुरक्षित करण्याचा अधिकार आहे, असे सांगत लसीकरणासाठी पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या सूचना अशा -  लसीकरण कार्यक्रमाची माहिती गावागावामध्ये देण्यासाठी सरकारी यंत्रणे एवढी दुसरी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसते त्यामुळे या यंत्रणेचा उपयोग करावा, आरोग्य विभागाच्या समवेत ग्रामविकास खात्याच्या ग्रामपंचायत, महसुल विभागाच्या तलाठी आणि नगरविकास विभागाच्या वॉर्ड कार्यालयापासुन ते आयुक्त कार्यालयापर्यंत सर्व यंत्रणा या कार्यक्रमात सज्ज कराव्यात, लसीकरणाचे केंद्र हे जास्तीत जास्त उप

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बीड, शिरूरमध्येही उभारणार कोविड केअर सेंटर - पंकजाताई मुंडे* *रूग्णांच्या सेवेसाठी भरीव योगदान देण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांना केल्या सूचना*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बीड, शिरूरमध्येही उभारणार कोविड केअर सेंटर - पंकजाताई मुंडे* *रूग्णांच्या सेवेसाठी भरीव योगदान देण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांना केल्या सूचना* बीड । दिनांक२७ । जिल्हयात कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता परळी प्रमाणेच बीड, शिरूर येथेही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज सांगितले. कोरोनाचा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे, रूग्णांच्या सेवेसाठी जिल्हयातील भाजपा कार्यकर्त्यांनी भरीव योगदान द्यावे असं आवाहनही त्यांनी केलं.    आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार भीमसेन धोंडे आणि जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची व्हर्चुअल बैठक पंकजाताई मुंडे यांनी आज दुपारी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सध्याच्या गंभीर परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी पंकजाताईंनी मध्यंतरी दौरा निश्चित केला होता. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे हया नुकत्याच कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांना भेटल्या, त्या क्वारंटाईन आहेत. कोरोनामुळे दौरा आणि गर्दीत कार्यकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ

MB NEWS-वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात नगर परिषदे ने प्रभाग निहाय जंतुनाशक फवारणी करून घ्यावी-प्रा. पवन मुंडे

इमेज
  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात नगर परिषदे ने प्रभाग निहाय जंतुनाशक फवारणी करून घ्यावी-प्रा. पवन मुंडे परळी प्रतिनिधी : परळी शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात नगरपालिका प्रशासनाने प्रभाग निहाय गल्लोगलीत जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे. परळी शहरात कोरोनाने थैमान घातले असून या गंभीर आजाराने अनेक लोक दगावत आहेत,तरी शहरातील विविध भागात घाणीचे  साम्राज्य पसरले आहे,शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागात प्रभागनिहाय पद्धतीने घरोघरी नगर परिषद प्रशासनाने जंतुनाशक फवारणी करून अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

MB NEWS-लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी वाहन सुविधा*

इमेज
 * लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे रुग्णांसाठी वाहन सुविधा* परळी वैजनाथ ते अंबेजोगाई सरकारी दवाखाना जाण्यासाठी रुग्णांना माफक दरात फक्त 500 रुपये डिझेल खर्चात चारचाकी गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिली. परळी वैजनाथ शहरांतर्गत वैद्यकीय सुविधांसाठी गाडी मोफत दिली जाईल असेही लोकसेवा तर्फे सांगण्यात आले आहे. गाडीची आसन क्षमता : 1 (चालक / ड्राईव्हर) + 3  हेल्पलाईन क्रं : 9527413467 गाडी नं : MH 02 AK 6081 मॉडेल : होंडा सी आर वी

MB NEWS-परळीच्या जुन्या पिढीतील प्रसिद्ध निर्भिड पत्रकार तथा सा. जगमित्रचे संस्थापक संपादक भास्करराव जोशी यांचे निधन *_ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी यांना पितृशोक !_*

इमेज
परळीच्या जुन्या पिढीतील प्रसिद्ध निर्भिड पत्रकार तथा सा. जगमित्रचे संस्थापक संपादक भास्करराव जोशी यांचे निधन *_ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी यांना पितृशोक !_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी         येथील गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा जुन्या पिढीतील निर्भिड जेष्ठ पत्रकार, संपादक भास्करराव जोशी यांचे आज दि.२६ रोजी औरंगाबाद येथे निधन झाले.क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना.धनंजय मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परळी व बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील जुना,जाणता, मार्गदर्शक हरवल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.                भास्करराव जोशी यांच्यावर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते ७५ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात वामन व प्रशांत ही दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत भास्करराव जोशी यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमिळाऊ

MB NEWS-आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव

इमेज
 " आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव    परळी वैजनाथ :- राज्यात वेगाने वाढत चाललेल्या कोरोना संर्सगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरातील वार्डा-वार्डात "आमचा गाव-आमची जवाबदारी" व "आमचा वार्ड-आमची जवाबदारी"या अभियानांतर्गत गावातील/शहरातील जेष्ठ व तरूणांनी विचारविनिमय करून गाव व वार्ड पातळीवर कोरोना नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात व समिती मार्फत गावातील, वार्डातील वाढत चाललेल्या कोरोना संर्सगावर उपाययोजना करण्याची व जनजागृती करून कोरोना संसर्ग नियत्रंनात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.                                   प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आसून संसर्ग अधिक झपाट्याने शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा

MB NEWS-कोराना लसीकरणबाबत विविध प्रश्नांवर समर्पक उत्तरे

इमेज
 *💉  पहीला डोस कोव्हॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोव्हीशिल्डचा, आपण घेऊ शकतो का ? 💉* *आता देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण अभियान सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर लस टोचून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाचं निरसन होणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर या लसीकरणाबाबत पुढील शंकाचे निरसन करण्यात आलेल्या आहेत. लस टोचून घेण्यापूर्वी नक्की वाचा... *कोरोनावर कोणती लस चांगली... कोव्हॅक्सिन की, कोव्हिशिल्ड?* संशोधनांती असं लक्षात आलं आहे की, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्हीही लसी परिणामकारक आहेत. नागरिकांना दोन्ही लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत. कारण, कोरोनासारख्या गंभीर आजारात मृत्यू होण्यापासून बचाव करतात. *पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घेऊ शकतो का?* नाही. कोरोनाच्या लसीकरणात दोन्ही वेळचे डोस एकच असावेत. *हार्ट बायपास झालेल्या रुग्णांना कोरोनाची लस देऊ शकतो का?* हो. हार्ट बायपास झालेल्या रुग्णांना कोरोनाची लस टोचली तरी चालते. *कोरोनाची लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे का?* याविषयी आपल्या देशात मर्यादि

MB NEWS-परळीचे जोशी दांम्पत्य: वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता कोरोनावर मात ⬛ कमाल:आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्‍तीच्या जोरावर आजाराला पळविले

इमेज
परळीचे जोशी दांम्पत्य: वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता कोरोनावर मात  ⬛ कमाल:आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्‍तीच्या जोरावर आजाराला पळविले ⬛   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता कोरोनावर मात करून परळीच्या जोशी काका-काकुंनी कोरोनाच्या टोकाच्या भयगंड व दहशतीच्या वातावरणात इतरांना धैर्याने सामना करण्याचा आदर्श घालून दिला आहे.आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्‍तीच्या जोरावर जोशी काका-काकुंनी आजाराला पळविले आहे.तसेच खचुन न जाता उपचाराला प्रतिसाद द्यावा, हे दिवसही जातील असा अनमोल सल्ला त्यांनी सर्वांना दिला आहे.          वय 80च्या वर, एचआरसीटी स्कोअर वाढलेला, त्यात बायपास सर्जरीची हिस्ट्री, वयोमानानुसार प्रकृतीच्या अन्य समस्या तरीही जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर परळीतील सेवानिवृत्त शिक्षक सर्व परिचित असलेल्या रमाकांतराव जोशी व सौ.विजयाबाई जोशी या दांपत्याने कोरोनाला हरविले आहे. विपरीत परिस्थितीत कोरानावर मात करणारे हे ज्येष्ठ नागरिक कोरोना झाला म्हणून

MB NEWS-ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू* *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

इमेज
 * ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू*  *जिल्हा रूग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* बीड । दिनांक २४।  अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.    आज पहाटे जिल्हा रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक सातमध्ये पाॅझेटिव्ह असलेले दोन रूग्ण दगावल्याची घटना घडली. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रूग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ••••

MB NEWS-दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन

इमेज
दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....              राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या  मातोश्री श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परळी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.       श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे  या अतिशय मनमिळाऊ व कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून परिचित होत्या.शिंदे परिवाराच्या आधारवड असलेल्या श्रीमंती रंजना शिंदे या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगी सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. ⬛ *आज सायंकाळी अंत्यसंस्कार*....        दरम्यान श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांच्या पार्थिवावर परळी येथे आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MB NEWS-विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

इमेज
  विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन परळी – प्रतिनिधी  शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे.     🔴🔴🔴परळी वै शहरांतील सर्व नागरिक, व्यापारी,दुकानदार यांना कळवण्यात येते की,उद्या दि 24 व 25 तारखेचा विकेंड पाळला जात असून 100%दुकाने ( फक्त दवाखाने व मेडिकल वगळून)बंद राहतील याची नोंद घ्यावी.🔴🔴🔴  उद्या व परवा जी दुकाने चालू असतील त्यांच्यावर (1) गुन्हे नोंद करणे(2) 1 तारखेपर्यंत (लॉक डाऊन काळ)दुकान सिल करणे (3)लायसन जप्त करण्याची कारवाई करणे अशी कारवाई अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी. 🔴महसूल,पोलीस,नप यांचे गोपनीय पथके शहरात फिरणार आहेत🔴                      सुरेश शेजुळ                  तहसीलदार परळी वै

MB NEWS-अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन*

इमेज
 * अंगरक्षकाच्या दुःखद निधनाने पंकजाताई मुंडे हळहळल्या ; व्हिडीओ काॅल करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली* *गोविंद मुंडे यांचे दुःखद निधन* परळी । दिनांक २२।  अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हळहळल्या. परिवाराला व्हिडीओ काॅल करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या कांही दिवसांपासून त्याला या आजारातून बरे करण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या परंतू काळाने त्याला अखेर हिरावून नेले.   कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले गोविंद मुंडे (वय ४०) हे पंकजाताई मुंडे यांचे २००९ पासून अंगरक्षक होते. मागील आठवडय़ात ते कोरोना पाॅझेटिव्ह आल्यानंतर त्यांचेवर परळीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. गोविंदची तब्येत सुधारावी ते यातून सुखरूपपणे बाहेर यावेत यासाठी पंकजाताई मुंडे दररोज डाॅक्टर, रूग्णालयातील यंत्रणा आणि त्याच्या कुटूंबियांशी बोलत होत्या, त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्या पश्चात आई, वडिल, भा

MB NEWS-बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला*

इमेज
 * बालरोग तज्ञ डॉ.देशपांडे 18 वर्षाखालील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना देणार मोफत कोविड विषयक सल्ला* परळी वैजनाथ(प्रतिनिधी) - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांनी गृह 18 वर्षांखालील विलगिकरणात असलेल्या रुग्णांना कोविड विषयक सल्ला व टेली उपचार मोफत देणार आहेत.नुकताच नवजीवन हॉस्पिटल चा 17 वा वर्धापन दिन संपन्न झाला त्याचे अवचित्त साधत या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 9822484202 या क्र. संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. या लहानमुलांमध्ये लक्षणे दिसून येत नसले तरी संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मुलांची संख्या ही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत 18 वर्षा खालील कोविड पाँझिटीव्ह गृह विलगिकरणात असलेल्या पेशंटना मोफत उपचार व्हाँटसापवर सल्ला सुरू करण्यात आला आहे. या सेवेबद्दल व सध्याच्या भयानक संकटात हा पुढाकार घेतल्याबद्दल कोविड रुग्णांच्या नातेवाईक व नागरि

MB NEWS-आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी*

इमेज
 * आरोग्य मित्रच्या वतिने परळीतील कोरोना रूग्ण व लसीकरण वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था* *निवासस्थान ते रूग्णालय मोफत सुविधा-चंदुलाल बियाणी* *परळी (प्रतिनिधी)* आरोग्य मित्रच्या वतिने परळी शहरातील कोरोना रूग्णांच्या व लसीकरण सोयीसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून रूग्णांना त्यांच्या घरापासून संबंधित रूग्णालय किंवा कोविड सेंटर पर्यंत जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. अंबाजोगाई मध्ये दाखल करायचे असल्यास मात्र भाडे लागणार असून परळी शहरातील व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. संचारबंदी व आजारामुळे अनेकांना रूग्णालयात जाईपर्यंत वेळ लागतो, आयत्यावेळी वाहन मिळत नाही अशा अडचणींचा अनेकांना सामना करावा लागल्यामुळे सदरची व्यवस्था करीत असल्याची माहिती आरोग्य मित्रचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून परळी शहरात दररोजच 50 ते 75 दरम्यान कोरोना रूग्ण आढळून येतात. अनेकदा या रूग्णांना उपचारसाठी दाखल करतांना वाहन मिळत नसल्याने अडचणींना तोंंड द्यावे लागत आहे. सध्या संचारबंदी असल्याने वाहतुकीचे नियम कडक असून अनेक वाहन चालक जोखीम नको म्हणून

MB NEWS -पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन

इमेज
पत्रकार विश्वास महाराज पांडे यांचे निधन परळी वैजनाथ दि. 17..      मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक तथा ह. भ. प. विश्वास महाराज पांडे यांचे आज शनीवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.       विश्वास महाराज पांडे हे अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन करत असत त्यामुळे त्यांना सर्वत्र पांडे महाराज म्हणून ओळखत असत. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. विशेष म्हणजे ते ह.भ. प.अर्जुन महाराज लाड (गुरुजी ) यांचे ते शिष्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शनिवार दि. 17 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याचे सुमारास दस्तापुर येथिल जवाईच्या  राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.        स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पार्थिवावर आज  सायंकाळी 6 वाजता दस्तापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.     स्व. विश्वास महाराज पांडे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे, असा भरगच्च परिवार आहे.त्यांच्या वर कोसळल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहेत

MB NEWS -तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार

इमेज
  तलफ लय बेक्कार रे $$$$$ .......! चक्क टरबूजातून कोरोना रुग्णांना खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार यवतमाळ :  यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रयत्न हाणून पाडला.         कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हा अजब प्रकार शौकीनांची तलफ भागविण्यासाठी केला. मात्र, हा सर्व प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील या प्रकारामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

MB NEWS -आजच्या अहवालात 1005 जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

इमेज
  आजच्या अहवालात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह ! विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन परळी – दि 15 प्रतिनिधी जिल्ह्यात शुक्रवार दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील  3655 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1005  जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर  2650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 142,आष्टी 168,बीड 348,गेवराई 67 माजलगाव 60,परळी 29, धारूर 29, केज 98, शिरूर 21 पाटोदा 21, वडवणी 22 परळी शहरात शुक्रवारी केवळ एक रुग्ण तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आढळून आले अंबाजोगाई शहरात दररोज द्विशतक पूर्ण होत असताना शुक्रवारी 142 रुग्ण आढळून आल्याने समाधानकारक परिस्थिती पहावयास मिळाली. यातच शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे

MB NEWS -निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक

इमेज
  निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे  निधन ह. भ. प. अॅड. दत्ता महाराज, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांना पितृशोक परळी वैजनाथ दि. १६..      ह. भ. प. दत्ता महाराज व परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांचे वडील, निवृत्त पोस्टमन रावसाहेब आंधळे यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षे होते.       मुळचे मरळवाडी येथील रहिवासी असलेले रावसाहेब आंधळे यांनी पोस्ट खात्यात अतिशय प्रामाणिक सेवा केल्याने त्यांचा सर्वत्र चांगला परिचय होता. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते सहभागी होत असत. पोस्टात येणाऱ्या प्रत्येकाशी अतिशय आपुलकीने वागणूक असायची. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी वाटत असे. गेल्या काही दिवसांपासून ते किरकोळ आजारी होते. त्यातच आज शुक्रवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याचे सुमारास कृष्णा नगर मधील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.        स्व. रावसाहेब आंधळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी परळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.      स्व. राव

MB NEWS - *बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा ; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहिती - पंकजाताई मुंडे यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र*

इमेज
 *बीड जिल्हयात रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवडा ; बीडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहिती - पंकजाताई मुंडे यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र* मुंबई । दिनांक १६। बीड जिल्हयात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना  फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.   सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्हयात आतापर्यंत ७२९ कोरोना पाॅझेटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या ३५ हजाराच्या आसपास गेली आहे.  एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना