MB NEWS-आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव

 "आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव 



  परळी वैजनाथ :- राज्यात वेगाने वाढत चाललेल्या कोरोना संर्सगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरातील वार्डा-वार्डात "आमचा गाव-आमची जवाबदारी" व "आमचा वार्ड-आमची जवाबदारी"या अभियानांतर्गत गावातील/शहरातील जेष्ठ व तरूणांनी विचारविनिमय करून गाव व वार्ड पातळीवर कोरोना नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात व समिती मार्फत गावातील, वार्डातील वाढत चाललेल्या कोरोना संर्सगावर उपाययोजना करण्याची व जनजागृती करून कोरोना संसर्ग नियत्रंनात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.                                   प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आसून संसर्ग अधिक झपाट्याने शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु त्यास जनतेकडून अपेक्षित आसे सहकार्य व प्रतिसाद मिळत नाही त्यांच्या सूचनांचे पालन होत नाही. त्यासाठी जनतेनेच मनावर घेऊन शासनाकडून मदतीची आपेक्षा न ठेवता गावपातळीवर व शहरात वार्ड पातळीवर सर्व सहमतिने एक कोरोना नियंत्रण समिती स्थापन करावी.व समिती मार्फत गावात/वार्डात जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवाव्यात.लोकांच्या मनात कोरोना बाबत आसलेली भीती व संभ्रम दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच शासन व प्रशासनांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी परावृत्त करावे.समिती मध्ये वार्डाचे नगरसेवक, गावचे सरपंच, उपसंरपच ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील सामाजिक कार्याची आवड आसलेले तरुण,जेष्ठ मंडळी व महिलांचाही समावेश असावा.असे अघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार