युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील खिल्लारे यांचे अकाली निधन

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील खिल्लारे यांचे अकाली निधन



परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी ) 

          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील संगणकशास्त्राचे प्रा.डॉ.सुनील खिल्लारे (वय ३३) यांचे अल्प आजाराने मंगळवारी (ता.२७) सायंकाळी दुखःद निधन झाले. बुधवारी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

                शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात संगणकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून प्रा.डॉ. सुनील खिल्लारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आजारी पडल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई,वडील, पत्नी, एक मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान बुधवारी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात श्रध्दांजली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ. आर.जे. परळीकर, प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रमोद पत्की, अनिल पत्की, प्रा.प्रविण फुटके उपस्थित होते. यावेळी त्यांच्या महाविद्यालयातील कार्याबदल उजाळा देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या