MB NEWS-परळीचे जोशी दांम्पत्य: वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता कोरोनावर मात ⬛ कमाल:आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्‍तीच्या जोरावर आजाराला पळविले

परळीचे जोशी दांम्पत्य: वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता कोरोनावर मात



 ⬛ कमाल:आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्‍तीच्या जोरावर आजाराला पळविले

 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली, व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार तरीही न डगमगता कोरोनावर मात करून परळीच्या जोशी काका-काकुंनी कोरोनाच्या टोकाच्या भयगंड व दहशतीच्या वातावरणात इतरांना धैर्याने सामना करण्याचा आदर्श घालून दिला आहे.आत्मविश्वास व रोगप्रतिकार शक्‍तीच्या जोरावर जोशी काका-काकुंनी आजाराला पळविले आहे.तसेच खचुन न जाता उपचाराला प्रतिसाद द्यावा, हे दिवसही जातील असा अनमोल सल्ला त्यांनी सर्वांना दिला आहे.

         वय 80च्या वर, एचआरसीटी स्कोअर वाढलेला, त्यात बायपास सर्जरीची हिस्ट्री, वयोमानानुसार प्रकृतीच्या अन्य समस्या तरीही जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर परळीतील सेवानिवृत्त शिक्षक सर्व परिचित असलेल्या रमाकांतराव जोशी व सौ.विजयाबाई जोशी या दांपत्याने कोरोनाला हरविले आहे. विपरीत परिस्थितीत कोरानावर मात करणारे हे ज्येष्ठ नागरिक कोरोना झाला म्हणून घाबरून व भेदरुन जाणारांसाठी 'दिशादर्शक'ठरले आहेत. केवळ प्रचंड धैर्य, आत्मविश्वास व दांडगी रोगप्रतिकारशक्‍ती या ज्येष्ठांच्या जिंकण्याचे कारण ठरली. सध्याच्या भयावह स्थितीत कोरोना बाधितांना आदर्श ठरावा असा कोरोनावर विजय जोशी दांपत्याने मिळविला आहे. 

          परळी येथील वैद्यनाथ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक सर्वपरिचित रमाकांतराव जोशी व सेवानिवृत्त शिक्षिका सौ.विजयाबाई रमाकांत जोशी यांची गेल्या २० दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्‍ला दिला.वय जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते परळीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरू असताना त्यांना काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दहा दिवस त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर घरी विलगीकरणात राहुन काळजी व उपचार घेतले.बघता-बघता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता त्यांची प्रकृती उत्तम असून, त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.

कोरोनाला घाबरू नका;हे दिवस पण जातील- जोशी काका-काकुंचा दुर्दम्य आशावाद....!

        रोगप्रतिकारशक्‍ती, जिद्द आणि इच्छाशक्‍तीच्या जोरावरच त्यांना कोरोनावर मात करणे शक्य झाले आहे. कोरोनाचा धसका न घेता, त्याला न घाबरता जिद्द व इच्छाशक्‍ती असल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य असल्याचा प्रत्यय जोशी दांम्पत्याच्या उदाहरणातून येत आहे.उत्तम आहाराबरोबरच चालणे, फिरणे आणि दैनंदिन कामे करण्याला ते प्राधान्य देतात.तरुण पीडिला मार्गदर्शन करताना ते सांगतात की बाबांनो, काळजी घ्या पण खचून जाऊ नका हे ही दिवस जातील.

⬛  मी घाबरुन गेलो होतो पण त्याही परिस्थितीत आई-बाबांनीच धीर दिला - मुलगा अजय जोशी

    जोशी दांपत्याच्या धैर्याचा प्रत्यय त्यांचा मुलगा क्रीडा शिक्षक अजय जोशी यांच्या बोलण्यातून येतो.आई बाबांना रुग्णालयात दाखल केले, परिस्थिती भयावह होती,मी स्वतः: खुप घाबरलो होतो.माझा आत्मविश्वास ढळत होता. त्यातच मलाही कोरोनाची लागण झाली.मलाही रुग्णालयात दाखल व्हावे लागले पण त्याही विपरीत परिस्थितीत आई-बाबांनीच मला धीर दिला असे मुलगा अजय जोशी यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !