इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बीड, शिरूरमध्येही उभारणार कोविड केअर सेंटर - पंकजाताई मुंडे* *रूग्णांच्या सेवेसाठी भरीव योगदान देण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांना केल्या सूचना*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बीड, शिरूरमध्येही उभारणार कोविड केअर सेंटर - पंकजाताई मुंडे*



*रूग्णांच्या सेवेसाठी भरीव योगदान देण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांना केल्या सूचना*


बीड । दिनांक२७ ।

जिल्हयात कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता परळी प्रमाणेच बीड, शिरूर येथेही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज सांगितले. कोरोनाचा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे, रूग्णांच्या सेवेसाठी जिल्हयातील भाजपा कार्यकर्त्यांनी भरीव योगदान द्यावे असं आवाहनही त्यांनी केलं.


   आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार भीमसेन धोंडे आणि जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची व्हर्चुअल बैठक पंकजाताई मुंडे यांनी आज दुपारी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सध्याच्या गंभीर परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी पंकजाताईंनी मध्यंतरी दौरा निश्चित केला होता. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे हया नुकत्याच कोविड सेंटर मध्ये जाऊन रूग्णांना भेटल्या, त्या क्वारंटाईन आहेत. कोरोनामुळे दौरा आणि गर्दीत कार्यकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी आज ऑनलाईन बैठक घेतली.


  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान परळीत आयसोलेशन सेंटर व रूग्णांना घरपोच जेवणाचा डब्बा पोहोचविणार आहे, याच धर्तीवर बीड व शिरूर मध्येही कोविड केअर सेंटर सुरू करू, त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास रूग्णांचा औषधोपचार व जेवणाची जबाबदारी प्रतिष्ठान घेईल असं पंकजाताई म्हणाल्या. इतर ठिकाणी आमदार महोदयांनी सेवा सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तालुका स्तरावर टास्क फोर्स तयार करून रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे, रेमडेसीवीर चा काळाबाजार रोखणे, जिल्हयात शासन व प्रशासनाचा निष्काळजीपणावर आवाज उठवणे आदींबरोबरच आगामी लसीकरण मोहीम प्रत्येक बुथवर प्रभावीपणे राबविण्यासाठी पंकजाताई यांनी बैठकीत सूचना केल्या.


  बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी तर संचलन शंकर देशमुख यांनी केले.आमदारांसह रमेश आडसकर, नंदकिशोर मुंदडा, निळकंठ चाटे, राम कुलकर्णी, डाॅ. शालिनी कराड, मधुसूदन खेडकर, सुधीर घुमरे, अजय सवई, अतूल देशपांडे, पोपट शेंडगे, बालासाहेब चोले, भगवान केदार, दिपक थोरात, अरूण राऊत आदींनी करोना संदर्भात मोलाच्या सूचना यावेळी केल्या. जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!