पोस्ट्स

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

#mbnews# >>>>बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इमेज
  गुटखा पकडला : एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  दिंद्रुड, प्रतिनिधी...  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या संशयित कंटेनरला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान भोपा पाटी वर पकडले असता जवळपास एक कोटी रुपयांचा राज निवास पानमसाला गुटखा आढळून आला. दिंद्रुड पोलीस  स्टेशनला कंटेनर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती.        गोपनीय माहितीच्या आधारे तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या एका कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेचा दोन पथकांनी पकडत दिंद्रुड पोलीस स्टेशनला आणले असता जवळपास 75 लाख रुपयांचा राजनिवास पानमसाला नावाचा गुटखा व अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती.  बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे सुशांत सुतळे, पो.हे.कॉं. शेख नसीर अशोक दुबाले कैला

भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात

इमेज
  भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात   परळी (प्रतिनिधी):                 येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, पालकांच्या प्रथम पसंतीस उतरलेले, एकमेवाद्वितीय भेल संकुलामध्ये इ .स 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील सी.बी.एस.ई व स्टेट या शाखांमधील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मा. डाॅ.श्री हेमंत वैद्य (सहकार्यवाह, भा. शि. प्र. सं अंबाजोगाई) आणि मा श्री. शरद राठोड साहेब (वेल्फेअर ऑफिसर) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. जीवनराव गडगूळ (सचिव ) यांनी भूषवले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. राहुल सूर्यवंशी सर व सौ.सुमेधा कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या संघाने 'सरस्वती स्तवन' व 'सामूहिक पद्य' सादर करून केली. त्यानंतर संकुलामधील सी.बी.एस.ई व स्टेट विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या

##mbnews# >>> आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर

इमेज
  आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर; रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आक्षेप अर्ज भरुन द्यावेत- अनंत इंगळे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी-परभणी  रेल्वे मार्ग दुहेरीकरण कामासाठी नागरी वस्त्यांमधील जमीनींचाही मोठ्या प्रमाणावर राजपत्रात समावेश आहे.हे अन्यायकारक असुन याबाबत नागरिकांनी अधिकाधिक आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे.यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आपले आक्षेप अर्ज भरुन द्यावेत असे आवाहन  रा.काॅ.शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.         परळी- परभणी रेल्वे  मार्गासाठी जमीन आधिग्रहन करण्याची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने काढली आहे. याकामी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबत रेल्वे मंत्रालयाने दि 18 जून 2024 रोजी काढलेल्या राजपत्रानुसार परळी रेल्वे स्थानक भागातून गंगाखेडच्या दिशेने असलेल्या नागरी वस्त्यांमधील व या भागातील अनेक जमिनी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आ

#mbnews#>>महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना

इमेज
  महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या  महामॅरेथॉन स्पर्धेत  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.         राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहर पोलीस स्टेशन समोरुन 'संत सेवालाल महाराज चौक' येथून सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 7:00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी-वै च्या वतीने शालेय गट,खुला गट,ज्येष्ठ नागरिक गट,महिला गट या चार गटात 'महामॅराथॉन स्पर्धा' आयोजित केली असून 'Green Parli...Clean Parli' हा निर्धार या 'महामॅराथॉन' स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 'महामॅराथॉन' स्पर्धेत प्रत्येक गटात आकर्षक पारितोषिक,मानचिन्ह प्राप्त होणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रविण्य प्रमाणपत्र आणि एक वृक्ष भेट दिले जाणार आहे.     नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून 'हरीत परळी.. स्वच्छ परळीचा निर्धार करा

वरळी ते परळी एकच जल्लोष

इमेज
पंकजा मुंडेंचा विजय ; परळीसह बीड जिल्ह्यात शहरे,गावागावात, वाडी,वस्ती,तांड्यांपासून ते गल्लोगल्लीत आनंदोत्सव  विधानभवन परिसर, प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष ढोल ताशांचा निनाद, गुलालांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी   विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणला मुंबई।दिनांक०१।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीत पहिल्या पसंतीची मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला.  या विजयानंतर परळीसह जिल्ह्यात अक्षरशः आनंदोत्सव साजरा झाला. विधानभवन परिसर आणि भाजप प्रदेश कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली.  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला.     विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी निकाल जाहीर झाला, यात पंकजाताई मुंडे पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाल्या, विजयासाठी २३ मतांचा कोटा असताना त्यांना २६ मते मिळाली. विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. कार्यकर्त्यांचा जल्लोष ; विधानभवन परिसर गुलालाने न्हाऊन निघाला पंक

मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव

इमेज
मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव परळी/प्रतिनिधी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांचा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर आमदार म्हणून विजय झाल्याबद्दल परळीत शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी फटाके फोडून व गुलाल उधळून मोठा आनंदोत्सव साजरा केला. आज विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार म्हणून विजयी झाले. ही बातमी समजताच परळी शहरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक येथे सायंकाळी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून, गुलाल उधळला व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रा.अतुल दुबे सर, मा.शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,  युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुं

पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष

इमेज
पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष परळी वैजनाथ ता.१२ (प्रतिनिधी)           भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाच्या वतीने विधानपरिषदेवर उमेदवारी घोषित करण्यात आली होती. शुक्रवारी (ता.१२) झालेल्या मतदानात विजयी झाल्याबद्दल शहरात विविध ठिकाणी गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करत  स्थानिक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.            भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून त्यांचे पक्षाच्या वतीने पुर्नवसन करा अशी मागणी समर्थकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. पंकजा मुंडे यांचे राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणूक वेळोवेळी संभाव्य यादीत नाव येत होते. पण पाच वर्षांत काही नंबर लागला नाही. यामुळे पक्षाने लोकसभेच्या निवडणूकीत डॉ प्रितम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर महाराष्ट्रातील समिकरणे बघता व ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्न तसेच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना पद द

#mbnews# 'विधानसभेला पुरे पाडा' चा फटका कोणाला बसणार?

इमेज
  लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही 'पुरे पाडा' चे शस्त्र - जरांगे-पाटलांचे बीडमधून सूचक वक्तव्य बी ड, प्रतिनिधी.....            बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही कोणालाच घाबरत नाहीत.आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे  ठणकावून सांगत लोकसभेप्रमाणे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी  मराठा समाजाला केले.           मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आज शांतता रॅलीला संबोधीत केले. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या शांतता रॅलींनी संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज बीड येथे झालेल्या शांतता रॅलीत तुफान गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी

धनंजय मुंडे यांचे महत्वपुर्ण ट्विट... बुद्धिभेद व अफवा करु नये

इमेज
  मराठा समाज शांतता रॅली: जिल्हा पोलीस प्रशासनाची रॅलीला परवानगी:जाणीवपूर्वक अफवा पसरवू नये -पालकमंत्री धनंजय मुंडे बीड, प्रतिनिधी.....      जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही.मराठा समाजाच्या शांतता रॅलीला जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारली अशा  प्रकारची जाणीवपूर्वक कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहन करणारे ट्विट पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.      मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाजबांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.         त्याचबरोबर, मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1998 सालापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडून

महाविकास आघाडीच्या बैठकीला सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे-बहादुरभाई

इमेज
रेल्वेजमीन अधिग्रहण:इंडिया आघाडीची उद्या बैठक  महाविकास आघाडीच्या बैठकीला सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे-बहादुरभाई परळी, प्रतिनिधी....        परळी शहरातील सर्वे नंबर 75 मधील वास्तव्यात असलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने परळी-परभणी रेल्वे मार्ग दुहेरी करणयासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा घाट घातला असुन या विषयी परळी शहरातील महाविकास आघाडीची  आज बुधवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय,नेहरू चौक येथे आयोजित केली आहे.या महत्वपुर्ण बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयात होणाऱ्या बैठकीला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख सह महाविकास आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.बैठक संपताच परळी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करुन निवेदन देण्यात देण्यात येणार असुन रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली आझादनगर,मिलिंद नगर, बरकत नगर,गंगा सागर नगर इत्यादी जागा अधिग्रहण करण्यासाठी अधिसूचना का

MB NEWS:संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना

इमेज
संत भगवानबाबा पालखी सोहळा मंगळवारी पाटोद्यात; संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना                     पाटोदा/अमोल जोशी                           महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग यांच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी  दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाटोद्यातून शेकडो दिंड्या व हजारो भाविक पाटोदा शहरातून रवाना झाले असून शेवटचा भगवानगड येथून येणारा भगवान बाबा पालखी सोहळा पाटोदा येथे उद्या सकाळी दहा वाजता  शहरात दाखल होणार आहे.          शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य दिव्य स्वागत होईल या नंतर बस स्टँड , बाजारतळ मार्गे हा पालखी सोहळा भामेश्वर मंदिरात दाखल होऊन तिथे दर्शन सोहळा होणार आहे सर्व वारकऱ्यांची जेवणाची सोय कन्या शाळा नगरपंचायत जवळ येथे केलेली आहे भगवान बाबांच्या पादुका दर्शना साठी व स्वागतासाठी  तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक सकाळीच पाटोद्यात दाखल होतात, दुपारी हा सोहळा दीघोळ कडे प्रस्थान करणार आहे. आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातील हजारो दिंड्या पंढरपूर येथे येतात त्यापैकी पंढरपूरमध्ये येणाऱ्या मानाच्या नऊ दिंड्या असतात त्या दिंड्यांमध्

राजाभाऊ फड यांची पत्रकार परिषदेत घोषणा

इमेज
आमजनतेचं प्रतिनिधित्व, डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास व भयमुक्त परळी यासाठी विधानसभा लढवणारच- राजाभाऊ फड  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात या विधानसभा मतदारसंघात बदल हवा आहे. तशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला आम जनतेतून मिळत आहे. त्यामुळे आम जनतेचे प्रतिनिधित्व, कागदावर नव्हे तर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास आणि भयमुक्त परळी मतदारसंघ करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करणार असून यासाठी कोणत्याही परिस्थितीत आणि ठामपणे विधानसभा निवडणूक आपण लढवणारच असल्याची घोषणा राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.              महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत.काहीही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक आपण लढविणारच असल्याची घोषणा रासप नेते, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाभाऊ फड यांनी केली. सोमवारी परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना राजेभाऊ फड म्हणाले की, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आपण आजच्या पत्रकार परिषदेची माहिती दिली

माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे निधन

इमेज
  माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे निधन  ............... नांदेड,प्रतिनिधी... नांदेड शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे सात जुलै रविवार रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 66 वर्षे होते. नांदेड येथील अमर, राजेश व योगेश नेरलकर यांच्या त्या मातोश्री होत.         गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार!

इमेज
  महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार! 11 जुलै रोजी होणार दिल्लीत वितरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार मुंबई (प्रतिनिधी) - माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सथाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार  समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 सालचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15 व्या 'एग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्ह'मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. एग्रीकल्चर टुडे च्या वतीने या पुरस्काराची सुरुवात 2008 सालापासून करण्यात आलेली आहे.  महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमास चा वापर यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प,

प्रा.डॉ.नयनकुमार आचार्य यांचे खास विवेचन >>>>>सार्थक व्हावे या जन्माचे!

इमेज
  सार्थक व्हावे या जन्माचे! जन्मास आलेल्या प्रत्येक मानवाने वरील तीन उद्दिष्टे आपल्यात आहेत काय? याचा विचार करावा. त्यांच्या प्राप्तीसाठी अहर्निश प्रयत्न करावेत. जीवनाची ही सर्वात मोठी साधना आहे. ज्याप्रमाणे धन, मान, प्रतिष्ठा इत्यादी मिळविण्याकरिता प्रत्येक माणूस धडपड करतो, त्याचप्रमाणे या तीन तत्त्वांना प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावयास हवा. त्याबरोबरच संततीला जन्मास घालू इच्छिणार्‍या दाम्पत्यानेदेखील वरील तीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवूनच गर्भाधान संस्कार करावा आणि जन्म दिल्यानंतरदेखील आपल्या मुलांबाळामध्ये वरील वेदोक्त उद्दिष्टांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा. जनिष्वा देववीतये सर्वताता स्वस्तये। आ देवान् वक्ष्य् अमृताँ ऋता वृधो यज्ञं देवेषु पिस्पृश:॥ (ऋग्वेद-6/15/18) अन्वयार्थ हे मानवा! तू (देव-वीतये) दिव्यत्वाच्या प्रकाशनासाठी (सर्व ताता= सर्व+तातये) सर्वांच्या विस्तार व विकासाकरिता (स्वस्तये) समग्र विश्वाच्या कल्याणाकरिता (जनिश्व) जन्म घे! सुसंततीला जन्माला घाल! याच त्रिविध उद्देशाकरिता (ऋता वृध:) सत्यवर्धनशील, सदाचारी अशा (अमृतान्) निर्दोष व अमृतमयी देवी-देवतांना, स

वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे  वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे  यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर  , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.       यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे असून मानवाच्या शाश्वत विकासासाठी त्या

धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्रीअंतरराष्ट्रीय योग खेळात स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले

इमेज
  सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्री अंतरराष्ट्रीय योग खेळात स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले परळी प्रतिनिधी  अंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा 29 जून 2024 नेपाळची राजधानी काठमांडू येथील बोगन व्हिला हॉलमध्‌ये संपन्न झाली. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेतेपद सोमेंद्र शास्त्री यांना प्राप्त झाले.  पहिल्या स्पर्धेत रिदमिक योगा व दुसरच्या स्पर्धेन ट्रेडिशनल योगा होता. ज्यात विभिन्न वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. चि सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्री याने 20 ते 25 या वयोगटातील ट्रेडिशनल योगा आणि रिदमिक योगा दोन्हींत भाग घेतला होता. त्यांच्या नियमित आसन अभ्यास व सातत्य योगाभ्यासाने अंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेच्या स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले.  या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, तरीही परळी येथील विद्या नगर भागातील रहिवासी प्रा. डॉ.वीरेन्द्र कुमार शास्त्री व प्रा.वीरश्री शास्त्री यांच्या सुपूत्राने सुवर्णपदक मिळवून फक्त बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र व भारत देशाचे गौरव वाढविला आहे- त्याच्या या यशाबद्दल सर्वांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार

इमेज
  भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार   शुक्रवारी सायंकाळी तेलगाव येथे घडला अपघात   धारूर, प्रतिनिधी....                 खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील वारकऱ्या धडक दिल्याने झालेल्या अपघातात वारकरी जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.       सेलु तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडी चालली होती.या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. ही दिंडी दि.३\७\२०२४ बुधवारी लाडनांद्रा येथुन निघाली होती.सदर दिंडी शुक्रवार दि.५रोजी तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती.दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडुन भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले.त्यांच्या डोक्यास जबर मार लागून रस्त्यावर रक्त सांडले होत

MB NEWS:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा

इमेज
  जन्मस्थान आपेगावचा   संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या पाटोद्यात !  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावचा हा पालखी सोहळा   पाटोदा /अमोल जोशी...          शुक्रवारी शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने पाटोद्यातून दिघोळ कडे प्रस्थान केल्यानंतर शनिवार 6 जुलै रोजी  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपेगाव   पाटोदा नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळा शहरात आल्यावर नगरपंचायत , पोलीस पाटील व  नागरिक यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत शिवाजी चौक येथे  करण्यात येते यावेळी बँड पथक, ढोली बाजा टाळ मृदुंगाच्या गजरात हा सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून बाजार तळ भामेश्र्वर मंदिर मार्गे काळा हनुमान ठाणा येथे मुक्कामी पोहचेल. या ठिकाणी सर्व वारकरी भाविक भक्ताची जेवण व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा प्रदीप सरवदे यांच्या वतीने भोजन व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत जोशी व अश्रूबा जाधव यांच्या वतीने नाश्ता व चहापाणी व्यवस्था केली आहे तसेच मुळे वस्ती व बिनवडे वस्ती येथेही चहा नाश्ता होणार आहे.  संत श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे जन्मगाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथू

एक लाख किलोमीटर सायकल चालवली .....!

इमेज
  परभणी ते पंढरपूर सायकलवारीचे परळीत स्वागत एक लाख किलोमीटर सायकल चालवणे पुर्ण केल्याबद्दल शंकर फुटके यांचा सत्कार परळी वैजनाथ दि.०५ (प्रतिनिधी)            परभणी येथील १५ सायकलस्वारांनी परभणी ते पंढरपूर सायकल वारी काढली असून दोन दिवसात अंदाजे ३५० किलोमीटर अंतर कापणार आहेत. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रमंडळीच्या वतीने स्वागत करण्यात आले.           परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांनी आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवणे सुरू केले आहे. हळूहळू यामध्ये जवळपास २०० ते २५० जण ज्यात विविध क्षेत्रातील आरोग्याची काळजी घेणारे सहभागी झाले. यातून सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली. सध्या हे सर्व सायकलस्वार रोज ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवतात, यातूनच पंढरपूर वारीची संकल्पना सुचली. यामध्ये काही डॉक्टर व युवक सहभागी झाले. शुक्रवारी (ता.०५) पहाटे ५ वाजता परभणी येथून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास १२५ किलोमीटरवर कळंब येथे मुक्काम तर दुसरा मुक्काम थेट पंढरपूर मध्ये असणार आहे. तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथे सकाळी सायकलवर प्रभात फेरी, नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण सो

पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

विद्यार्थिनीनी परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आगारप्रमुख संतोष महाजन

इमेज
विद्यार्थिनीनी परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आगारप्रमुख संतोष महाजन परळी आगाराकडून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीना मोफत पास वाटप परळी वैजनाथ दि.२ (प्रतिनिधी)    विद्यार्थ्यांनी मोफत पास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख संतोष महाजन यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगाराच्या वतीने अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेतंर्गत विद्यार्थींनींना लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पासचे वाटप आगारप्रमुख संतोष महाजन व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.व महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.       परळी आगाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयात विविध पास व सवलतीचा जागर केला जात आहे. येथील आगर प्रमुख संतोष नागनाथ महाजन यांच्यासह आगारातील कर्मचारी हे शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शालेय पास व सवलतीच्या लाभाविषयी माहिती देत आहेत तसेच नियमित विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवास पास योजनेतून विद्यार्थिनींना मोफत पास मुलांच्या हाती देण्याची सोय उपलब्ध केली आ

कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे

इमेज
  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून परळीतील 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे वाटप कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....          बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने (लालबावटा) नोंदी केलेल्या 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे (भांडे) मंडळाकडून बीड येथे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना सुरक्षा(पेटी) व गृहउपयोगी संच(भांडे) मोफत वाटप केली जातात. यापूर्वी पेट्या व गृहउपयोगी संच तालुक्याच्या ठिकाणी किवा कामगारांच्या राहत्या गांवात आणून दिले जात होते. परंतू कामगारांची फार लूट होत आहे म्हणून मंडळाने जिल्हा ठिकाणीच पेट्या व भांडे कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे असे अधिकाऱ्यांकडून बोलते जाते.           गृहउपयोगी संच आणणे प्रत्येक कामगाराम अत्यंत त्रासदायक आहे.संच वाटप केंद्र बीडपासून आठ किलोमीटर दूर आहे व रिक्षा किमान 500 रु. घेतो. जिल्हयातील बांधकाम कामगारांना संच मिळण्यासाठी तालुक्याप्रमाणे वार ठरवून दिले आहेत परंतू जिल्ह‌यातील सर्व ठिकाणचे कामगार

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट

इमेज
पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट मुंबई(प्रतिनिधी)  भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केवळ बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातल्या हितचिंतक तथा अठरापगड जातीधर्माच्या सामान्य लोकांना कमालीचा आनंद वाटला. मात्र विधान परिषद हे आमच्या नेतृत्वासाठी मिळालेली संधी आनंदाची गोष्ट असली तरी  यापेक्षा मोठं होवुन संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करावं अशा प्रकारची भावना परळीतुन आलेले कडवे समर्थक नरसिंग सिरसाट यांनी व्यक्त केली आहे.        पंकजा मुंडे यांच्या वरळी स्थित निवासस्थानी तीन दिवसापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन भेटण्यास येणार्‍याच्या गर्दीत तुफान वाढ झाली.मागच्या पाच वर्षापासुन राजकिय प्रतिष्ठा मिळण्याची सामान्य लोक वाट पहात होते.पक्षानं विधान परिषद उमेदवारी पहिल्या क्रमांकात त्यांना दिली. कदाचित भविष्यात मोठी राजकिय जबाबदारी देखील त्यांच्यावर येवु शकते यात तिळमात्र शंका नाही. नरसिंग सिरसाट ज्यांना सावकार म्हणुन परळीत ओळखल्या जातं. पंकजाताईचे कडवे समर्थक असंही म्हणता येईल.नगर परिषद, बाजार समिती