वरळी ते परळी एकच जल्लोष

पंकजा मुंडेंचा विजय ; परळीसह बीड जिल्ह्यात शहरे,गावागावात, वाडी,वस्ती,तांड्यांपासून ते गल्लोगल्लीत आनंदोत्सव 


विधानभवन परिसर, प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

ढोल ताशांचा निनाद, गुलालांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी 



 विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणला


मुंबई।दिनांक०१। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीत पहिल्या पसंतीची मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला.  या विजयानंतर परळीसह जिल्ह्यात अक्षरशः आनंदोत्सव साजरा झाला. विधानभवन परिसर आणि भाजप प्रदेश कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली.  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला.


    विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी निकाल जाहीर झाला, यात पंकजाताई मुंडे पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाल्या, विजयासाठी २३ मतांचा कोटा असताना त्यांना २६ मते मिळाली. विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

कार्यकर्त्यांचा जल्लोष ; विधानभवन परिसर गुलालाने न्हाऊन निघाला



पंकजाताई  मुंडे यांच्या आजच्या विजयाकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. विजय जाहीर होताच राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विधानभवन परिसर अक्षरशः गुलालाने न्हाऊन निघाला तर विजयाच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर पंकजाताईंचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते मोठया संख्येने जमले होते, पंकजाताईंनी याठिकाणी जाऊन सर्वांचे स्वागत स्वीकारले, यावेळी ढोल ताशांचा निनादात कार्यकर्ते आनंदाने बेभान झाले होते. दरम्यान, परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टाॅवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पंकजाताईंच्या यशःश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलाल उधळून एकच जल्लोष केला. जिल्ह्यात बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई आदींसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार