मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव
मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव
परळी/प्रतिनिधी
शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांचा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर आमदार म्हणून विजय झाल्याबद्दल परळीत शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी फटाके फोडून व गुलाल उधळून मोठा आनंदोत्सव साजरा केला.
आज विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार म्हणून विजयी झाले. ही बातमी समजताच परळी शहरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक येथे सायंकाळी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून, गुलाल उधळला व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रा.अतुल दुबे सर, मा.शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, बबन ढेंबरे, अमित कचरे, बजरंग औटी, मनिष जोशी, लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर,सोमनाथ गायकवाड,पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार,विकास देवकर, सुधाकर बारसकार आदींसह असंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा