##mbnews# >>> आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर
आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर; रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आक्षेप अर्ज भरुन द्यावेत- अनंत इंगळे
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरण कामासाठी नागरी वस्त्यांमधील जमीनींचाही मोठ्या प्रमाणावर राजपत्रात समावेश आहे.हे अन्यायकारक असुन याबाबत नागरिकांनी अधिकाधिक आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे.यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आपले आक्षेप अर्ज भरुन द्यावेत असे आवाहन रा.काॅ.शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.
परळी- परभणी रेल्वे मार्गासाठी जमीन आधिग्रहन करण्याची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने काढली आहे. याकामी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबत रेल्वे मंत्रालयाने दि 18 जून 2024 रोजी काढलेल्या राजपत्रानुसार परळी रेल्वे स्थानक भागातून गंगाखेडच्या दिशेने असलेल्या नागरी वस्त्यांमधील व या भागातील अनेक जमिनी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. नागरी वस्त्यांमधील जमीनी अधिग्रहण करणे अन्यायकारक आहे.या विरोधात रेल्वे प्राधिकरणाकडे अधिकाधिक कायदेशीररित्या आक्षेप नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी अनंत इंगळे यांचे संपर्क कार्यालय, इंदिरानगर, कन्याशाळा रोड परळी वैजनाथ येथे दि.१४ जुलै रोजी सकाळी 9 ते सायं.6 वा.पर्यंत आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी आक्षेप अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असुन नागरिकांनी आपापली आवश्यक कागदपत्र जोडून हे अर्ज दाखल करावे.
अधिक माहितीसाठी रा.काॅ.शहर सरचिटणीस अनंत इंगळे मो.क्र. 9822576003 यांच्याशी संपर्क साधावा.या शिबिरात रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी अधिकाधिक आपले आक्षेप अर्ज भरुन द्यावेत असे आवाहन रा.काॅ.शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा