इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

विद्यार्थिनीनी परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आगारप्रमुख संतोष महाजन

विद्यार्थिनीनी परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आगारप्रमुख संतोष महाजन



परळी आगाराकडून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीना मोफत पास वाटप

परळी वैजनाथ दि.२ (प्रतिनिधी)
   विद्यार्थ्यांनी मोफत पास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख संतोष महाजन यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगाराच्या वतीने अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेतंर्गत विद्यार्थींनींना लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पासचे वाटप आगारप्रमुख संतोष महाजन व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.व महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 
     परळी आगाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयात विविध पास व सवलतीचा जागर केला जात आहे. येथील आगर प्रमुख संतोष नागनाथ महाजन यांच्यासह आगारातील कर्मचारी हे शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शालेय पास व सवलतीच्या लाभाविषयी माहिती देत आहेत तसेच नियमित विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रवास पास योजनेतून विद्यार्थिनींना मोफत पास मुलांच्या हाती देण्याची सोय उपलब्ध केली आहे. शहरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात ज्या गावात मासिक पास सवलत धारक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून एसटी फेऱ्या कमी आहेत.विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून केला जात आहे तर आवश्यकतेनुसार काही मार्गावर फेऱ्या उपलब्ध केल्या जात आहेत. मंगळवारी (ता.०२) शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात अहिल्याबाई होळकर योजनेतंर्गत मोफत पासचे वाटप व विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी आगाराचे आगार व्यवस्थापक संतोष महाजन, प्रवाशी मित्र जी.एस. सोंदळे, रमेश गित्ते, धनंजय मुंडे,वरिष्ठ लिपिक विजय सोनवणेसह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा डॉ लक्ष्मण मुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रविण फुटके, आभार डॉ लक्ष्मण मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!