राजाभाऊ फड यांची पत्रकार परिषदेत घोषणा

आमजनतेचं प्रतिनिधित्व, डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास व भयमुक्त परळी यासाठी विधानसभा लढवणारच- राजाभाऊ फड 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात या विधानसभा मतदारसंघात बदल हवा आहे. तशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला आम जनतेतून मिळत आहे. त्यामुळे आम जनतेचे प्रतिनिधित्व, कागदावर नव्हे तर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास आणि भयमुक्त परळी मतदारसंघ करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करणार असून यासाठी कोणत्याही परिस्थितीत आणि ठामपणे विधानसभा निवडणूक आपण लढवणारच असल्याची घोषणा राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

            महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत.काहीही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक आपण लढविणारच असल्याची घोषणा रासप नेते, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाभाऊ फड यांनी केली. सोमवारी परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना राजेभाऊ फड म्हणाले की, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आपण आजच्या पत्रकार परिषदेची माहिती दिली असुन महाविकास आघाडीच्या सर्व  प्रमुख नेत्यांना भेटून आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खा.सुप्रिया सुळे,जयंत पाटील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उद्यापासून भेटी घेणार आहोत.परळी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी दाखल करणार हे मात्र निश्चित असल्याचे  त्यांनी सांगितले.


Click:■ महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार!

      मागील काळात विकासाच्या फक्त गप्पा मारण्यात आल्या.कागदावरच विकास राहिला मात्र प्रत्यक्षात विकास केला गेला नाही.या विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी राजकारणात येत आहे. बारामतीच्या धर्तीवर परळीचा आम्ही विकास करून दाखवू अशीही घोषणा त्यांनी केली. जर यात कोणी काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. परळीला आता भयमुक्त करायचे आहे, जनतेच्या डोळ्याला दिसेल असा विकास करून दाखवायचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काहीही झाले तरी आमजनतेचं प्रतिनिधित्व, डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास व भयमुक्त परळी यासाठी निवडणूक लढविणारच असा आपला ठाम निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार